आजरा ग्रामीण रुग्णालय ५० बेडचे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:21 AM2021-01-15T04:21:40+5:302021-01-15T04:21:40+5:30

आजरा : आजरा ग्रामीण रुग्णालय ५० बेडचे करावे, रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी पाठविलेला २७ कोटी ५६ लाखांच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी, ...

Make Ajra Rural Hospital 50 beds | आजरा ग्रामीण रुग्णालय ५० बेडचे करा

आजरा ग्रामीण रुग्णालय ५० बेडचे करा

Next

आजरा : आजरा ग्रामीण रुग्णालय ५० बेडचे करावे, रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी पाठविलेला २७ कोटी ५६ लाखांच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी, अशी जोरदार मागणी आजरा पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांनी केली. एस.टी.च्या बंद असलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या फेऱ्या तातडीने सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. अध्यक्षस्थानी सभापती उदय पवार होते. श्रद्धांजलीचा ठराव सदस्य शिरीष देसाई यांनी मांडला. गटविकास अधिकारी बी. डी. वाघ यांनी स्वागत केले.

मासेवाडी येथील वीज वितरणच्या उपकेंद्राची टेंडर प्रक्रिया आठ दिवसात सुरू होणार असल्याचे सहायक अभियंता दयानंद कमतगी यांनी सांगितले. आजरा नगरपंचायतीच्या पाणी योजनेला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून चित्री प्रकल्पातील पाणी सोडण्यात येणार असल्याचे शाखा अभियंता एन. बी. मळगेकर यांनी सांगितले.

रब्बी हंगाम २४५ हेक्टरवर घेतला आहे. फिरत्या पक्ष्यांच्या विष्ठेतून बर्ड फ्लूचा विस्तार होतो. पण, तालुक्यात कोठेही तशा प्रकारची साथ नसल्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एन. बी. जालकर यांनी सांगितले.

टंचाई आराखड्यातून १२ गावांना विंधन विहिरी, हरपवडेपैकी धनगरवाड्याला नवीन पाणी योजनेचा प्रस्ताव पाठविला आहे. स्वाध्याय उपक्रमांतर्गत पालकांना माहिती देऊन विद्यार्थ्यांना १०० टक्के सहभागी करून घ्या. १५ व्या वित्त आयोगाचे ग्रामपंचायतींना दोन हप्ते जमा झाले आहेत.

सभेतील चर्चेत सभापती उदय पवार, सदस्य शिरीष देसाई, बशीर खेडेकर, रचना होलम यांनी भाग घेतला.

* मोरेवाडी शाळा खोलीचा निर्लेखन प्रस्ताव मंजूर

हत्ती व गवे नुकसान भरपाई म्हणून १ कोटी ११ लाख शेतकऱ्यांना दिले.

तालुक्यात १०२ जणांवर टीबी उपचार सुरू.

* गेले वर्षभर अंगणवाडीला बालविकास प्रकल्प अधिकारीच नाहीत.

* चित्री ९९ टक्के, एरंडोळ ९१, धनगरवाडी ८४, तर खानापूर तलावात ६७ पाणीसाठा.

* ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीची बैठक घ्या : सदस्यांची मागणी

Web Title: Make Ajra Rural Hospital 50 beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.