कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी यंदा बाराही तालुक्यात राजकारणाचे बारा रंग पहावयास मिळत आहेत. ग्रामीण भागातील राजकारणाचा पोतच या निवडणुकीने बदलल्याचे दिसून येत असून पारंपरिक राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली आहे.हातकणंगले तालुक्यातील ११ जिल्हा परिषद आणि २२ पंचायत समितीसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट दुरंगी सामना होत आहे. तर एका ठिकाणी शिंदेसेनेच्या बंडखोराने घाम फोडला असून दुसरीकडे महायुतीमधील भाजपनेच जनसुराज्यच्याविरोधात उमेदवार दिला आहे.करवीर तालुक्यात महायुतीत जागा वाटपावरून फूट पडली तर महाविकास आघाडीत काँग्रेसने आघाडीतील कोणत्याही इतर पक्षाला उमेदवारी दिलेली नाही. करवीर विधानसभा मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एकत्र आले असून शिंदेसेना स्वतंत्र लढत आहे. महायुतीमध्ये बिघाड झाल्याने भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र आले तर शिंदेसेना स्वतंत्र लढत आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत आहे.शाहूवाडी तालुक्यात चार जिल्हा परिषद गटात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत काट्याची लढत होत आहे. तर दोन गटात भाजपने पहिल्यांदाच उमेदवार उभे केले आहेत. जनसुराज्य विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पक्ष अशीही लढत येथे आहे.राधानगरी तालुक्यात काँग्रेस एकसंघ असून विरोधात भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हे स्वतंत्रपणे लढत आहेत. त्यामुळे सर्वच नेत्यांचा कस लागणार आहे. भुदरगडमध्ये दुरंगी लढतीचा थरार पहावयास मिळत असून दोन्ही काँग्रेस विरुद्ध शिंदेसेना, भाजप या लढती लक्षवेधी ठरणार आहेत.पन्हाळा तालुक्यात सोयीच्या राजकारणाने पारंपरिक निवडणुकीची समीकरणे बदलली आहेत. एका ठिकाणी जनसुराज्यचा अपक्षाला पाठिंबा तर दुसरीकडे शिंदेसेनेने भाजपला पाठिंबा दिला आहे. पक्षापेक्षा गटा-तटाच्या राजकारणाला महत्व असलेल्या कागल तालुक्यात प्रमुख चार गट सक्रिय आहेत. एकूणच तालुक्यात हसन मुश्रीफ, दोन घाटगे विरुद्ध मंडलिक असाच सामना होत आहे. शिरोळ नगरपालिकेपासून सुरू झालेला संघर्ष आता जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचला आहे.आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासमोर मित्रपक्ष असलेल्या भाजपनेच मोठे आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे, काँग्रेस, उद्धवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी एकत्र भक्कम मोट बांधली आहे. तालुक्यातील सर्वच मतदारसंघांत आता टोकदार तिरंगी सामने पाहायला मिळत आहेत. गगनबावडा तालुक्यात काँग्रेसविरोधात महायुती असे थेट लढत आहे.
आजरा, गडहिंग्लज, चंदगडमध्येही वेगळे वातावरणआजरा तालुक्यातील उत्तुर गटात महाडिक यांच्या ताराराणी आघाडीचा प्रयोग होत आहे. या निमित्ताने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आजरा तालुक्यात मोर्चेबांधणी केली असून राष्ट्रवादीसमोर आव्हान निर्माण केले आहे. गडहिंग्लज तालुक्यात राष्ट्रवादीविरोधात जनता दलाने भाजपमध्ये विलीनीकरण झाले असून चंदगडमध्ये भाजपने काँग्रेसचा एक गट फोडला आहे.
Web Summary : Kolhapur Zilla Parishad elections witness shifting alliances, creating multi-cornered fights. Factions emerge over party lines in several talukas, challenging traditional political equations. The MahaYuti and MahaVikas Aghadi face internal conflicts, with BJP, Shiv Sena, and Congress vying for dominance, resulting in complex electoral battles.
Web Summary : कोल्हापुर जिला परिषद चुनावों में बदलते गठबंधनों से बहुकोणीय मुकाबले हो रहे हैं। कई तालुकों में पार्टी लाइनों से ऊपर गुट उभर रहे हैं, जिससे पारंपरिक राजनीतिक समीकरणों को चुनौती मिल रही है। महायुति और महाविकास अघाड़ी आंतरिक संघर्षों का सामना कर रहे हैं, भाजपा, शिवसेना और कांग्रेस वर्चस्व के लिए प्रतिस्पर्धा कर रहे हैं, जिसके परिणामस्वरूप जटिल चुनावी लड़ाईयां हो रही हैं।