शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर ‘महायुती’च, पण अध्यक्ष ‘राष्ट्रवादी’चाच - हसन मुश्रीफ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:17 IST

'विरोधक अर्धे राज्य देण्याचे आश्वासनही देतील. परंतु, त्याला बळी पडू नका'

गडहिंग्लज : दोन्ही राष्ट्रवादीमधील पहिले ऐक्य चंदगडमध्ये व नंतर पुणे जिल्ह्यात झाले. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात यापुढेही कायमचे एकत्र राहणार आहोत. भविष्यात चंदगड व गडहिंग्लज मतदारसंघ वेगळे झाले तरी दोन्ही आमदार राष्ट्रवादीचेच असतील. जिल्हा परिषदेवर महायुतीचीच सत्ता येईल. परंतु, अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल, असा विश्वास वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.नूल येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील तालुक्यातील राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यानिमित्ताने कुपेकर बहिण-भाऊ, चव्हाण काका-पुतणे एकत्र आले. स्व. कुपेकरांनी बांधलेला पक्ष पुन्हा मजबूत झाला, असेही त्यांनी नमूद केले. माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, स्व. कुपेकर, नरसिंगराव पाटील व अजितदादांना खरी श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे.

वाचा: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या राजकारणाचे १२ तालुक्यांत २४ रंग; कुणी दिली पक्षाला सोडचिठ्ठी, कुणाची विरोधकांशी हातमिळवणीडॉ. नंदिनी बाभूळकर म्हणाल्या, मुश्रीफांमुळेच आम्ही एकत्र आलो. त्यामुळे कार्यकर्ते व जनतेतील गैरसमज दूर झाले. एक-दोन कार्यकर्ते बाहेर गेले तरी जनता राष्ट्रवादीसोबतच आहे.प्रकाश चव्हाण म्हणाले, केवळ मुश्रीफांच्या सहकार्यामुळेच गडहिंग्लज कारखान्याचे चाक फिरत आहे. त्यांच्यामुळेच आम्ही निवडणुकीला सामोरे जात असून अनेक कुटूंबे एकत्र आली आहेत.यावेळी उदय जोशी, जयसिंग चव्हाण, भैरू पाटील-वाघराळकर यांचेही भाषण झाले.सभेस गडहिंग्लज कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे, वरदशंकर वरदापगोळ, डॉ. यशवंत चव्हाण, रामराज कुपेकर, संतोष पाटील-कडलगेकर आदींसह सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अर्धे राज्यही देतीलविरोधकांकडून लाखाची नव्हे तर कोटीची भाषा सुरू आहे. अर्धे राज्य देण्याचे आश्वासनही देतील. परंतु, त्याला बळी पडू नका, असे आवाहन नंदिनी बाभूळकर यांनी केले.

अजितदादांना माझा शब्द, मात्र जोशी नाव विसरले !चंदगड एकच राहिला तर नंदिनी बाभूळकर किंवा राजेश पाटील यांच्यापैकीच एक आमदार होईल असे उदय जोशी यांनी भाषणात नमूद केले. मात्र, चंदगड, गडहिंग्लज वेगळे झाले तर राष्ट्रवादीला दोन आमदार आणि चंदगड एकच राहिले तरीही आमदार राष्ट्रवादीचाच होईल. असा शब्द आपण अजितदादांना अडकूरच्या सभेत दिला होता. परंतु, जोशींनी नाव जाहीर करायचे विसरले, असा चिमटा माजी आमदार राजेश पाटील यांनी काढला.

English
हिंदी सारांश
Web Title : MahaYuti in Kolhapur Zilla Parishad, Nationalist Congress Party President: Hasan Mushrif

Web Summary : Hasan Mushrif expressed confidence that MahaYuti will rule Kolhapur Zilla Parishad, with a Nationalist Congress Party president. He highlighted unity among party members and emphasized the party's strength, even if constituencies change. He urged people to support Nationalist Congress Party candidates.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेस