शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

CoronaVirus Lockdown : महावीर सेवा ट्रस्टचे रुग्णालय ठरतेय सामान्य रुग्णांसाठी आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 5:25 PM

येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात विशेष कोरोना कक्ष स्थापन केल्यामुळे नियमित तपासणीसाठी आणि उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत आहे. कसबा बावड्याच्या सेवा रुग्णालयात सेवा सुरू असली तरी शहरातील खासगी दवाखाने अद्यापही बंदच असल्याने नियमित रुग्ण बाजार गेट येथील महावीर सेवा धाम ट्रस्टच्या रुग्णालयाकडे धाव घेत आहेत.

ठळक मुद्देमहावीर सेवा ट्रस्टचे रुग्णालय ठरतेय सामान्य रुग्णांसाठी आधारतीन डॉक्टर देत आहेत सेवा : ‘कोरोना’मुळे नियमित रुग्णसंख्येत वाढ

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात विशेष कोरोना कक्ष स्थापन केल्यामुळे नियमित तपासणीसाठी आणि उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत आहे. कसबा बावड्याच्या सेवा रुग्णालयात सेवा सुरू असली तरी शहरातील खासगी दवाखाने अद्यापही बंदच असल्याने नियमित रुग्ण बाजार गेट येथील महावीर सेवा धाम ट्रस्टच्या रुग्णालयाकडे धाव घेत आहेत.कोरोना विषाणुशी संबंधित रुग्णांवरच लक्ष केंद्रित केल्यामुळे सामान्य रुग्णांची हेळसांड होत आहे. कसबा बावडा येथील सेवा रुग्णालय जरी सुरू असले तरी ते शहरापासून दूर असल्याने मध्यवस्तीतील महावीर सेवा धाम ट्रस्टच्या सेवार्थ रुग्णालयाचा सामान्य रुग्णांना आधार वाटत आहे.महावीर ट्रस्टच्या या सेवा रुग्णालयात १ एप्रिलपासून बाह्य रुग्ण विभाग सुरू ठेवण्यात आला आहे. रोज सकाळी ८ ते २ या वेळेत हा विभाग सुरू असून, यासाठी वीस रुपये इतकीच तपासणी फी आकारली जाते. याशिवाय येथील अद्ययावत प्रयोगशाळेत रोज सकाळी १० ते १ या वेळेत सर्व प्रकारच्या तपासण्याही अत्यंत माफक दरात करण्यात येत आहेत.या रुग्णालयात डॉ. मयूरेश पाटील, डॉ. अभिजित पाटील आणि डॉ. विजया खोत हे नियमित सेवा देत आहेत. ट्रस्टने त्यांच्यासाठी या काळात खास संरक्षक किटचीही व्यवस्था केली आहे. याशिवाय बाह्य रुग्ण विभागात सध्या चार कर्मचारी आणि प्रयोगशाळेत एका तंत्रज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तीन कर्मचारी सेवेत आहेत.या रुग्णालयात २ एप्रिल रोजी १७, ३ एप्रिल रोजी १९ आणि ४ एप्रिल रोजी ३८ रुग्णांची नोंद झाली आहे. सर्दी, ताप, खोकला यासह रक्तदाब, मधुमेही रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय रक्तातील साखर, लिपिड प्रोफाईल यासारख्या नियमित चाचण्याही प्रयोगशाळेत होत आहेत.

सामाजिक अंतर ठेवून रुग्णांचा वैद्यकीय इतिहास नोंदवून त्यांची तपासणी करून योग्य उपचारासह मोफत औषध दिले जाते. ‘कोरोना’शी संबंधित लक्षणे दिसताच त्यांना सीपीआरमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो तसेच योग्य ते समुपदेशनही येथे केले जाते.डॉ. विजया खोतवैद्यकीय अधिकारी,महावीर सेवा धाम ट्रस्टचे सेवार्थ रुग्णालय, बाजारगेट, कोल्हापूर.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर