शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-ZP Election: ‘महाविकास’मध्ये मिटतंय तर ‘महायुती’मध्ये पेटलंय!; अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:14 IST

काहींचे पक्षांतर, काहींचा इशारा 

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुकांची संख्या वाढतच निघाल्याने आज बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड झुंबड उडणार आहे. रात्री उशिरापर्यंत अनेक तालुक्यात राजकीय घडामोडी सुरूच होत्या. यामध्ये ‘महाविकास आघाडीमध्ये मिटतंय परंतु महायुतीमध्ये पेटलंय’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

प्रत्येक तालुक्यातील छोट्या गटांना, नेत्यांना स्थान देताना दोन्हीकडील नेत्यांची दमछाक होत आहे. उमेदवारी मिळणार नसल्याने पक्षांतरालाही प्रारंभ झाला असून राजीनामेही दिले जात आहेत. जिल्हा परिषदेसाठी २४९ तर पंचायत समितीसाठी ३०३ उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज दाखल केले आहेत.मंगळवारी दिवसभर झालेल्या घडामोडीत शिरोळ, हातकणंगले, गगनबावडा तालुक्यात शिंदेसेना आणि भाजप युती नक्की झाली आहे. हातकणंगलेमध्ये उर्वरित जागांसाठी जनसुराज्यसोबत चर्चा सुरू आहे. राधानगरीमध्ये शिंदेसेना-भाजप युती फिस्कटली आहे. तर भुदरगडचा निर्णय अजून झालेला नाही. शाहूवाडी, पन्हाळ्यात भाजप-जनसुराज्य स्वतंत्र लढणार आहे.कागलमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप एकत्र आले असून शिंदेसेना स्वतंत्र आहे. तर चंदगडमध्ये भाजप स्वतंत्र लढेल हे स्पष्ट झाले आहे. आजऱ्यामध्ये दोन्हीकडे गोंधळ सुरू आहे. काँग्रेसचे ४० उमेदवार हात चिन्हावर रिंगणात उतरणार असून करवीर वगळता अन्य ११ तालुक्यातील जागा वाटपाचा प्रश्न मिटला असल्याचे सांगण्यात आले.

शीतल फराकटे यांची टीकाराष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी उमेदवारी मिळणार नसल्याने व्हिडिओच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली असून आम्ही केवळ सभाच गाजवायच्या का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी अपक्ष उभारणार असल्याचेही जाहीर केले.

ए.वाय. काँग्रेससोबतजिल्हा बँकेचे संचालक ए.वाय. पाटील यांनी राधानगरी तालुक्यात काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. भोगावती कारखान्याचे संचालक धीरज डोंगळे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने उमेदवारी नाकारल्याने ते देखील काँग्रेसच्या संपर्कात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP Elections: Cracks in Alliance as Nomination Deadline Nears

Web Summary : Kolhapur ZP elections see tensions within alliances as the nomination deadline approaches. Mahavikas Aghadi shows unity, while Mahayuti faces internal conflicts. Seat distribution challenges and candidate dissatisfaction lead to defections and resignations across various talukas.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी