Maharashtra Election 2019:निवडणूकीचे कर्तव्य बजावताना मतदान अधिकाऱ्यांचा हृदयविकाराने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 23:25 IST2019-10-21T23:23:04+5:302019-10-21T23:25:22+5:30
Maharashtra Election 2019: कागल तालुक्यातील हसूर खुर्द येथील मतदान अधिकारी सर्जेराव भोसले यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज (सोमवारी) मृत्यू झाला.

Maharashtra Election 2019:निवडणूकीचे कर्तव्य बजावताना मतदान अधिकाऱ्यांचा हृदयविकाराने मृत्यू
कोल्हापूर: कागल तालुक्यातील हसूर खुर्द येथील मतदान अधिकारी सर्जेराव भोसले यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज (सोमवारी) मृत्यू झाला.
सर्जेराव भोसले यांची अध्यापक लक्ष्मी विद्यालय हसूर खुर्द ता कागल यांची मतदान केंद्र क्र २१ पोहाळे तर्फ बोरगाव विद्यामंदिर पूर्व बाजू खोली क्र २ येथे मतदान अधिकारी क्र १ म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
या ठिकाणी निवडणूक कर्तव्य बजावत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारासाठी दाखल केले. परंतु, त्यांची प्रकृती अत्यवस्थ वाटल्याने त्यांना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचारासाठी दुपारी ४ वा दाखल करण्यात आले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा सायंकाळी ४-३० वाजण्याचा सुमारास मृत्यू झाला.