Maharashtra Election 2019: Amit Shah will arrive two hours late | Maharashtra Election 2019 : दिल्लीतील खराब हवामानामुळे अमित शहा यांना कोल्हापुरात पोहोचण्यास होणार उशीर

Maharashtra Election 2019 : दिल्लीतील खराब हवामानामुळे अमित शहा यांना कोल्हापुरात पोहोचण्यास होणार उशीर

कोल्हापूर - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे दोन तास उशीरा कोल्हापूरात आगमन होणार आहे..महायुतीच्या प्रचारार्थ त्यांची येथील तपोवन मैदानावर जाहीर सभा होणार आहे. दिल्लीत हवामान चांगले नसल्याने त्यांच्या विमान प्रवासास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांचा दौरा दोन तास  लांबणीवर पडला आहे..कोल्हापूरातील सभेची नियोजित वेळ ११.१५ वाजताची होती, त्यामुळे सभास्थळी दहा वाजल्यापासूनच कार्यकर्ते येऊन बसले आहेत.

अमित शहा यांचा आज वाढदिवस आहे आणि ते कोल्हापूरचे जावई असल्याने अंबाबाईला जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते सभास्थळी येणार आहेत. कोल्हापूरची सभा झाल्यानंतर त्यांची कराडला सभा आहे. 

Web Title: Maharashtra Election 2019: Amit Shah will arrive two hours late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.