शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 19:41 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने विधानसभेसाठी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. या यादीत ६५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. आज सकाळीच राधानगरी विधानसभा मतदारसंघातील के.पी. पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांनाही आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत

तर दुसरीकडे शाहुवाडी विधानसभा मतदारसंघातून सत्यजीत आबा पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे आता जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांच्याविरोधात सत्यजीत पाटील अशी लढत होणार आहे. तर राधानगरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून के.पी. पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे गटाचे नेते प्रकाश आबिटकर यांच्याविरोधात के.पी. पाटील यांच्यात लढत होणार आहे. 

के.पी. पाटील यांनी आज सकाळीच ठाकरे गटात प्रवेश केला आहे. याआधी ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात होते. महाविकास आघाडीमध्ये राधानगरीची जागा ठाकरे गटाला गेली आहे. 

ठाकरे गटाने आज उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे जागावाटप अजूनही सुरू आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे जागावाटप झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत खासदार राऊत यांनी दिली महाविकास आघाडीमध्ये तिनही पक्ष ८५ जागा लढवणार असल्याचे बोलले जात आहे. ८५ चा फॉर्म्युला ठरला आहे. अन्य १८ जागा या घटक पक्षांना देण्यात येणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी सांगितले.  

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई यांच्यासह इतर पक्षातून प्रवेश घेतलेल्या नेत्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीत मुंबईतील ३६ जागांपैकी सर्वाधिक जागा उद्धव ठाकरे गट लढवणार असल्याचं चित्र आहे. त्यात पहिल्या यादीत १३ जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक 2024Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस