शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Assembly Election 2019 : शहरात सायकलवरून मतदान जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 1:21 PM

महानगरपालिका, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद यांच्यातर्फे विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान व्हावे, यासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. या अंतर्गत गुरुवारी गांधी मैदान येथून सायकलवरून मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देशहरात सायकलवरून मतदान जनजागृती रॅलीमतदारांना मतदान करण्याचेआवाहन

कोल्हापूर : महानगरपालिका, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद यांच्यातर्फे विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान व्हावे, यासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. या अंतर्गत गुरुवारी गांधी मैदान येथून सायकलवरून मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली.

या रॅलीमध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, तुषार ठोंबरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संगमेश्वर कोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था व नागरिकांना मतदानाबाबत प्रतिज्ञा दिली.यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, मतदारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता नि:स्वार्थीपणे मतदान करावे. नागरिकांना निर्भयपणे मतदान करण्यास प्रवृत्त करावे. महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदानादिवशी दिव्यांग बांधवांना सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा देण्यात येत आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरामध्ये यावेळी उच्चांकी मतदान होईल.यानंतर शहरातून सायकलने रॅली काढून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. युवकांचे मतदान राज्य निर्माणातील योगदान, मतदानासाठी वेळ काढा - आपली जबाबदारी पार पाडा, मतदार राजा जागा हो - लोकशाहीचा धागा हो, सर्वांची आहे जबाबदारी - मत देणार सर्व नर-नारी, माझे मत - माझा अधिकार असे फलक लावण्यात आले होते.

गांधी मैदान, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी, महापालिका, सीपीआर चौक, दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा ते बिंदू चौक अशी रॅली काढण्यात आली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, नगरसचिव दिवाकर कारंडे, प्रशासनाधिकारी शंकर यादव, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, ग्रंथपाल रत्नाकर जाधव, विजय वणकुद्रे यांच्यासह दत्ताजीराव माने शाळा, कोल्हापूर हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.जिल्हाधिकारी, आयुक्त, सीईओंचा सेल्फीमहापालिकेच्या वतीने मतदान जनजागृतीसाठी सेल्फी पॉइंट करण्यात आला आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सेल्फी घेतला. चार मतदान जनजागृती चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. या चित्ररथांचेही उद्घाटन करण्यात आले. 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर