शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत होणार ‘महाभरती’

By admin | Updated: November 28, 2014 23:44 IST

नव्या आकृतिबंधास वेग : लवकरच प्रस्ताव पाठविणार; ७०० नवे कर्मचारी येणार

संतोष पाटील - कोल्हापूर -महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून गेली ४० वर्षे नवी कामगार सूची झाली नाही. शहराची लोकसंख्या चौपट झाली, विभाग व घरे तिप्पट झाली. तरी कामगारांचा आकृतिबंध १९७४ साली होता तोच आहे. मात्र आता स्थायी समितीची शिफारस व महासभेच्या मंजुरीमुळे नव्या कामगार सूचीला वेग आला आहे. प्रशासनाने प्रस्ताव पाठविल्यानंतर येत्या तीन महिन्यांत महापालिकेत तब्बल २० टक्के नोकर वाढणार असून, ७०० हून अधिक कामगारांची भरती होणार आहे.राज्यातील ‘बेबी कॉर्पोरेशन’ म्हणून १६ एप्रिल १९७४ रोजी कोल्हापूरला लोकसंख्येचा निकष बसत नसतानाही विशेष बाब म्हणून महापालिका स्थापन करण्यात आली. त्यावेळी शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, शनिवार पेठ, राजारामपुरी, शाहूपुरी, बावडा असे जुने पेठांचे कोल्हापूरच अस्तित्वात होते. १९९२ नंतर शहरीकरणाचा वेगाने विस्तार झाला. नगरपालिका असताना पावणेदोन लाख असणारी लोकसंख्या आता सहा लाखांचा टप्पा ओलांडत आहे. मात्र, महापालिकेत असणारी कर्मचाऱ्यांची सूची व आकृतिबंध १९७४ चा आहे. यामध्ये दर दहा वर्षांनी आवश्यक असणारा बदल केला गेला नाही.सध्या महापालिकेत ४८०० कायम, तर ५५० रोजंदारीवरील कर्मचारी आहेत. यातील १५०० झाडू कामगार, ३१२ सफाई कामगार व ६४१ ‘पवडी’ कामगार आहेत. एकूण कर्मचाऱ्यांपैकी तब्बल तीन हजार कर्मचारी इतर कामांसाठी वापरातील आहेत. १८०० कर्मचाऱ्यांवर ३६ विभागांचा भार आहे. यामध्ये ४२ खातेप्रमुख आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांची तांत्रिक, अतांत्रिक, लेखा व प्रशासकीय अशी विभागणी आहे. शहरात १९७४ साली ५० हजार मिळकती होत्या. आज त्या १,३६,००० आहेत. लोकसंख्याही चौपट झाली. मात्र, नोकरभरती झाली नसल्याने रोजंदारीसह ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांवर काम चालविले जात आहे. नागरिकांना वेळेत सुविधा देण्यासाठी नव्याने आकृतिबंध करण्याचा निर्णय घेतला आहे.१ कोटी ६० लाखांचा भारमहापालिकेतील नोकरपगारावर सध्या आठ कोटी रुपये खर्च होतात. नव्या भरतीनंतर यामध्ये एक कोटी साठ लाखांची भर पडणार आहे. मात्र, यामुळे २० टक्के जागांचे मनुष्यबळ शहरवासीयांच्या सेवेत दाखल होईल.राज्य शासनाने नव्या आकृतिबंधानुसार नोकरभरती सुरू केली आहे. ‘बीपीएमसी अ‍ॅक्ट’ कलम ५१ अनुसार याचा कोल्हापूरला फायदा होऊ शकतो. प्रशासनाने कायद्याच्या चाकोरीतून प्रस्ताव पाठविल्यास तीन महिन्यांत नव्या नोकरभरतीचा मार्ग खुला होणार आहे.