शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात ‘जादू गु्रप’ची जादू

By admin | Updated: September 4, 2016 01:26 IST

नावीन्यपूर्ण गणेशमूर्तींची परंपरा : स्थापनेपासून डॉल्बी लावला नाही

कोल्हापूर : गेली २१ वर्षे नावीन्यपूर्ण गणेशमूर्ती व देखाव्यांच्या माध्यमातून गणेशोत्सवाचा सण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी ठरलेल्या टेंबे रोडवरील ‘जादू गु्रप’ची जादू काही औरच म्हणावी लागेल. स्थापनेपासून या मंडळाने एकदाही डॉल्बी लावलेला नाही. विशेष म्हणजे या मंडळासमोर असंख्य डॉल्बी सिस्टीम व्यावसायिकांची दुकाने आहेत. तरीही हे मंडळ ‘नो डॉल्बी’वर ठाम आहे. टेंबे रोड येथील राजारामियन क्लबच्या भिंतीलगत ‘जादू गु्रप’ची १९९५ साली स्थापना केली. यामध्ये १६ ते २२ वयोगटातील मुलांचा समावेश होता. विशेष म्हणजे या मंडळाने स्थापनेपासून आजतागायत देखाव्यांमध्ये व नावीन्यपूर्ण गणेशमूर्तींमध्ये सातत्य राखले आहे. वास्तव व कॉमेडी एक्सप्रेस हे सजीव देखावे, संगीत कारजा, डरना जरुरी हे हे भयपट असलेले सजीव देखावे सादर के ले. हेरंब गणेश, विठ्ठल वारकरी, काशी गणेश, अनंतभूज इच्छापूर्ती गणेश, बाजीप्रभू देशपांडे, आदी नावीन्यपूर्ण गणेशमूर्ती साकारल्या होत्या. यंदा गु्रपच्या स्थापनेला २१ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मंडळाने थायलंड येथील ‘सुवर्णभूमी मंथन’ हा ५० फूट लांबीचा देखावा सादर केला आहे. याशिवाय गु्रपने रक्तदान शिबिरे, फुटबॉल स्पर्धा, वृक्षारोपण, आदी सामाजिक कार्यक्रमांना स्थान दिले आहे. या गु्रपचे अध्यक्ष स्वप्निल भोसले, तर प्रसाद चौगले हे उपाध्यक्ष आहेत. या मंडळात अमोल सुर्वे, विकास गोडकर, अमोल चौगले, रूपेश सुर्वे, चंद्रकांत माने, संदीप पाटील, युवराज भोसले, भरत शिंदे, साईदास शिंदे, रणजित मगदूम, महेश देसाई, चंद्रकांत पोवार, हर्षल सुर्वे, सूरज कलावंत, संतोष सदलगे, प्रीतम शिंदे, महावीर पाटील, रोहन हातकर, शुभम साबळे, अक्षय भोसले, शुभम पोवार, हरीश चौगले, मनीष मिठारी, दीपक पाटील, विजय मेटील, राजू गोलंदाज, उमेश कारंडे, संदेश कदम, पृथ्वीराज साडविलकर, राजू परमाळे, महीम शेख, आदींनी एकत्रित येत स्थापनेपासून मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा विडा उचलला होता. त्यानूसारच केवळ गणेशोत्सवातील वर्गणीतून जमणारा निधी अधिक प्रत्येक सभासदांकडून इच्छेला होईल ती वर्गणी एकत्रित करून हा उत्सव साजरा केला जातो. कोणत्याही दुकानदाराला वर्गणीसाठी हे मंडळ सक्ती करीत नाही. गु्रपच्या स्थापनेपासून मंडळाची मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघते आणि मग मूर्ती विसर्जन केले जाते. आमच्या मंडळाच्या आसपास डॉल्बी साऊंड सिस्टीमची विक्री करणारी अनेक दुकाने आहेत. त्यांतील काही दुकानदारांनी मंडळाला वर्गणीरूपातून डॉल्बी बेस देण्याचा दोन वर्षांपूर्वी घाट घातला होता. मात्र, आम्ही कार्यकर्त्यांनी याला नकार दर्शविला. स्थापनेपासून कुठल्याही प्रकारचा धांगडधिंगाणा न घालण्याचे व्रत आपण अंगीकारले आहे. त्यामुळे आपण डॉल्बीला विरोधच करायचा, असा निश्चय केला. त्यानुसार आम्ही डॉल्बी लावणार नाही. - संदीप पाटील जादू गु्रप, पदाधिकारी