माद्याळ, तमनाकवाडात सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:24 IST2021-01-20T04:24:06+5:302021-01-20T04:24:06+5:30

सेनापती कापशी : माद्याळ (ता. कागल) येथे मोठ्या चुरशीने मतदान झाल्याने येथील निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. याठिकाणी तिरंगी ...

In Madyal, Tamanakwada | माद्याळ, तमनाकवाडात सत्तांतर

माद्याळ, तमनाकवाडात सत्तांतर

सेनापती कापशी : माद्याळ (ता. कागल) येथे मोठ्या चुरशीने मतदान झाल्याने येथील निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. याठिकाणी तिरंगी लढत झाली. यामध्ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे विश्वासू व तालुका संघाचे अध्यक्ष सूर्याजी घोरपडे यांनी एकहाती सत्ता मिळवत सत्तांतर केले.

मुश्रीफ-मंडलिक विरुद्ध संजय घाटगे- समरजित घाटगे युती अशी लढत रंगली. मुंबईकर ग्रामस्थ यांनी तिसरे पॅनल उभे केले होते. सूर्याजी घोरपडे व मारुती चोथे यांच्या नेतृत्वाखालील भावेश्वरी (अंबाबाई ) ग्रामविकास आघाडीने नऊ जागांवर विजय मिळवत सत्तांतर घडवले.

आलाबाद येथे माजी पं. स. सदस्य जे. डी. मुसळे यांच्या नेतृत्वाखालील मंडलिक-मुश्रीफ युतीने ८ जागा मिळवत सत्ता राखण्यात यश मिळविले. विशेष म्हणजे जे. डी. मुसळे यांचे चिरंजीव दिनेश व सून वंदना मुसळे हे पती-पत्नी मोठ्या फरकाने निवडून आले. तमनाकवाडा येथे महाविकास आघाडीने मोठा विजय मिळवत सत्तांतर घडविले. मासा बेलेवाडीत महाविकास आघाडीने आठ जागांवर विजय मिळविला, तर अपक्ष उमेदवार बबन शिंत्रे हे विजयी झाले. हसूर खुर्दमध्ये सर्वपक्षीय आघाडी विरुद्ध मुश्रीफ यांचे विश्वासू अंकुश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये लढत झाली. यामध्ये सर्वपक्षीय आघाडीने सत्ता मिळवली. मांगनूरमध्ये सर्वपक्षीय आघाडी विरुद्ध अपक्ष अशी लढत पाच जागांसाठी झाली. यामध्ये पाचही जागांवर सर्वपक्षीय आघाडीने विजय मिळविला. चार जागा बिनविरोध निवडून आल्या.

..........

१८ अलाबाद

फोटो : आलाबाद (ता. कागल) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत दिनेश मुसळे व वंदना मुसळे हे पती-पत्नी मोठ्या फरकाने विजयी झाले. यावेळी दिनेश मुसळे यांनी पत्नीला असे उचलून घेत आनंद व्यक्त केला.

Web Title: In Madyal, Tamanakwada