Kolhapur: यंत्रमाग कामगाराने घेतली पंचगंगा नदीत उडी, त्याच्या पत्नीनेही नदीत उडी घेण्याचा केला प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:33 IST2023-08-08T19:32:52+5:302023-08-08T19:33:46+5:30
घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज

Kolhapur: यंत्रमाग कामगाराने घेतली पंचगंगा नदीत उडी, त्याच्या पत्नीनेही नदीत उडी घेण्याचा केला प्रयत्न
इचलकरंजी : येथील मोठ्या पुलावरून एका यंत्रमाग कामगाराने पंचगंगा नदीत उडी घेतली. विनोद शब्बीर शिकलगार (वय २९, रा.यड्राव फाटा परिसर) असे त्याचे नाव आहे. ही घटना समजताच घटनास्थळी आलेल्या त्याच्या पत्नीनेही नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नातेवाइकांनी तिला पकडले. घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. घटनेनंतर आपत्कालीन व्यवस्थापन पथकाकडून विनोद याचा नदीपात्रात शोधकार्य सुरू आहे.
विनोद हा मंगळवारी सकाळी पुतण्या गणेश याच्या मोटारसायकलवरून त्याच्यासोबत घरातून बाहेर पडला. तेथून थेट ते दोघे पंचगंगा नदी पुलावर आले. त्याठिकाणी गणेश मोबाईलवर बोलत असताना विनोद याने नदीत उडी घेतली. या प्रकारामुळे भांबावलेल्या गणेशने आरडाओरड केला. त्यामुळे नागरिक जमले. ही घटना समजताच पत्नी व नातेवाइकांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पत्नीनेही नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला.