शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

कोल्हापूरात कुलूप तोडून सहा तोळ्याचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 5:22 PM

कोल्हापूर येथील शिवाजी पार्क येथे फ्लॅटचे कुलूप तोडून सहा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. याबाबतची फिर्याद अनिलकुमार बाळगोंडा पाटील (वय ५२) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली.

ठळक मुद्देकुरिअरवाल्याने दिली माहितीचोरी दुपारनंतरच झाल्याची शक्यता

कोल्हापूर , दि. २८ :  येथील शिवाजी पार्क येथे फ्लॅटचे कुलूप तोडून सहा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. याबाबतची फिर्याद अनिलकुमार बाळगोंडा पाटील (वय ५२) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, शिवाजी पार्क येथील शांती रेसिडेन्सीमध्ये दुसऱ्या मजल्यावर अनिलकुमार पाटील यांचा फ्लॅट आहे. तीन दिवसांपूर्वी ते कुटुंबासमवेत तिरुपती येथे देवदर्शनासाठी गेले होते.

शुक्रवारी रात्री ते तिरुपतीहून कोल्हापूरला परतले. त्यावेळी त्यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाच्या शटरचे कुलूप तोडून मुख्य दरवाजाच्या लॅचचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत पाटील यांनी पोलिसांना कळविले. त्यानुसार शनिवारी सकाळी पोलीस निरीक्षक संजय मोरे व पोलीस उपनिरीक्षक पवार घटनास्थळी आले.

स्वंयपाक खोलीशेजारी असलेल्या बेडरुममधील तिजोरीतील अडीच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, एक तोळ्याचे सोन्याच्या कानातील तीन जोड व अडीच तोळ्याचा सोन्याचा नेकलेस असा सुमारे सहा तोळ्याचा एक लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोरे पुढील तपास करीत आहेत.

कुरिअरवाल्याने दिली माहितीअनिलकुमार पाटील यांच्या घरी शुुक्रवारी सकाळी कुरिअरवाला पार्सल देण्यासाठी आला होता. त्यावेळी घराला कुलूप असल्याने त्याने अनिलकुमार पाटील यांच्यांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी आम्ही बाहेर गावी असल्याचे कुरिअरवाल्याला सांगितले. त्यामुळे तो तेथून गेला. त्यानंतर पुन्हा शनिवारी सकाळी कुरिअरवाला पार्सल घेऊन आला. त्यावेळी त्याठिकाणी पोलीस असल्याचे पाहिले.

कुरिअरवाल्याने ‘मी शुक्रवारी सकाळी आलो होता, तेव्हा घराला कुलूप होते’ असे पोलिसांना सांगितले. त्यामुळे ही चोरी दुपारनंतरच झाल्याची शक्यता पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी वर्तविली आहे. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर