Kolhapur: ‘लोकमत’चे फलक मोर्चात उत्स्फूर्तपणे झळकले, दांभिकतेला चपराक दिल्याची मोर्चेकऱ्यांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:11 IST2026-03-31T12:10:29+5:302026-03-31T12:11:24+5:30

गावकऱ्यांनी मानले ‘लोकमत’चे आभार

Lokmat's role appreciated in the march after the dispute between the priest and the villagers of Jyotiba Devasthan | Kolhapur: ‘लोकमत’चे फलक मोर्चात उत्स्फूर्तपणे झळकले, दांभिकतेला चपराक दिल्याची मोर्चेकऱ्यांची भावना

Kolhapur: ‘लोकमत’चे फलक मोर्चात उत्स्फूर्तपणे झळकले, दांभिकतेला चपराक दिल्याची मोर्चेकऱ्यांची भावना

कोल्हापूर : धार्मिक ठिकाणी सुरू असलेल्या दांभिकतेवर ‘लोकमत’ने प्रहार करून देव आणि भक्तांमधील अंतर अधिक जवळ आणले आहे. ‘लोकमत’ची ही पत्रकारिता खऱ्या अर्थाने समाजाशी जोडली गेली आहे, या शब्दांत भोगावती खोऱ्यातील ग्रामस्थांनी ‘लोकमत’च्या भूमिकेचे कौतुक केले.

वाडी रत्नागिरीतील जोतिबा देवस्थानचे पुजारी व परिते ग्रामस्थांमध्ये झालेल्या वादानंतर ‘लोकमत’मध्ये ‘लगाव बत्ती’ या सदराखाली रविवारी (दि. २९) ‘दांभिकतेचा उन्माद’ हा लेख प्रसिद्ध झाला. पुजाऱ्यांविरोधात परिते ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात या लेखाचे फलक घेऊन नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.

वाचा: गुंडप्रवृत्ती हटवा...जोतिबावर पगारी पुजारी नेमा; परितेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी 

गावकऱ्यांनी मानले ‘लोकमत’चे आभार

परिते ग्रामस्थांनी या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी गावकऱ्यांची रविवारी बैठक घेतली होती. या बैठकीतही ‘लोकमत’च्या या लेखाची जोरदार चर्चा झाली. चूक बरोबर कोण, यापेक्षा देव आणि भक्तांमध्ये जे अंतर पाडतात, अशा ठिकाणच्या दांभिकतेचा पर्दाफाश केल्याबद्दल गावकऱ्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.

वाचा: आम्ही डोकं टेकवायचं, तुम्ही जनावरासारखं बदडायचं, हा उन्माद सहन करणार नाही

अन् सगळ्यांच्या मोबाइलला ‘लोकमत’चे स्टेटस

पुजाऱ्यांविरोधात ग्रामस्थांनी काढलेल्या मोर्चादरम्यान भोगावती खाेऱ्यातील ग्रामस्थांच्या मोबाइलचे स्टेटस ‘लोकमत’च्या ‘दांभिकतेचा उन्माद’ या लेखाने भरून गेले होते. महिलांसह तरुणांनीही हा लेख स्टेटसला ठेवला, अनेकांनी सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर हा लेख शेअर केला होता.

‘लोकमत’मध्ये ‘लगाव बत्ती’ या सदराखाली प्रसिद्ध झालेला ‘दांभिकतेचा उन्माद’ हा लेख खऱ्या अर्थाने दांभिकता दाखवणाऱ्यांच्या डाेळ्यांत जळजळीत अंजन घालणारा आहे. ‘लोकमत’ची ही पत्रकारिता समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देणारी आहे. - मोहन ढेरे, परिते
 

जोतिबा मंदिरावरील पुजारी आणि परिते ग्रामस्थांमध्ये वाद झाला. पुजाऱ्यांनी खोटेनाटे आरोप केले. मात्र, ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेला ‘दांभिकतेचा उन्माद’ हा लेख ज्यांनी वाचला त्यांना चूक कुणाची आहे, हे कळाले आहे. हा लेख कुणाच्या बाजूने नाही तर जे दांभिकपणा करतात त्यांना सणसणीत चपराक देणारा आहे. - ऋतुराज पाटील, परिते, ता. करवीर

जिथे धार्मिक भावना जोडल्या जातात तिथे दांभिकतेने उच्छाद गाठला आहे. ‘लोकमत’ने हीच दांभिकता उजेडात आणून पत्रकारितेचा धर्म जोपासला आहे. - जयसिंग पाटील, मालवे, ता. राधानगरी

Web Title : कोल्हापुर विरोध में 'लोकमत' का पाखंड के खिलाफ रुख

Web Summary : ज्योतिबा मंदिर में पाखंड को उजागर करने वाले 'लोकमत' के लेख ने विरोध प्रदर्शन को जन्म दिया। ग्रामीणों ने 'लोकमत' के लेख के साथ मार्च किया, भक्तों और भगवान के बीच की खाई को पाटने में इसकी भूमिका की सराहना की। लेख वायरल हुआ।

Web Title : Lokmat's Stand Against Hypocrisy Resonates in Kolhapur Protest

Web Summary : Lokmat's article exposing hypocrisy at Jotiba temple sparked a protest. Villagers marched with Lokmat's article, praising its role in bridging the gap between devotees and the divine. The article became a viral status, underscoring Lokmat's impact.