CoronaVIrus Kolhapur : लॉकडाऊन कडकच ; भाजीपाला मात्र प्रभागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 19:58 IST2021-05-21T19:57:32+5:302021-05-21T19:58:26+5:30
CoronaVIrus Kolhapur : कडकडीत लॉकडाऊनच्या सहाव्या दिवशीही कोल्हापूर शहर बंदच राहिले. अत्यावश्यक सेवेतील तसेच वैद्यकिय कारणास्तव बाहेर पडलेले काही नागरीक वगळता शहरातील सर्व रस्त्यावर कमालीची शांतता होती. शुक्रवारीपासून काही ठिकाणी भाजी विक्री सुरु झाल्याचे पहायला मिळाले.

CoronaVIrus Kolhapur : लॉकडाऊन कडकच ; भाजीपाला मात्र प्रभागात
कोल्हापूर : कडकडीत लॉकडाऊनच्या सहाव्या दिवशीही कोल्हापूर शहर बंदच राहिले. अत्यावश्यक सेवेतील तसेच वैद्यकिय कारणास्तव बाहेर पडलेले काही नागरीक वगळता शहरातील सर्व रस्त्यावर कमालीची शांतता होती. शुक्रवारीपासून काही ठिकाणी भाजी विक्री सुरु झाल्याचे पहायला मिळाले.
शनिवारी मध्यरात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन सुरु आहे. सर्व जनता घरात बसली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा, सरकारी कर्मचारी वगळता अन्य कोणीही घराबाहेर पडलेले नाही.
भाजी विक्रेत्यांनाच घरोघरी जाऊन भाजी विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु गेल्या चार दिवसात भाजी विक्रेतेही कुठे बाहेर पडले नव्हते. परंतु या दोन दिवसात काही विक्रेते भाजी घेऊन थेट प्रभागात जाऊन विक्री करत आहेत. लॉकडाऊन आणि कडेकोट पोलिस बंदोबस्त असल्यामुळे आसपासच्या ग्रामिण भागातून कोणी भाजी घेऊन कोल्हापूर शहरात येण्याच्या फंदात पडले नव्हते.
शहरातील काही भागात विक्रेत्यांनी ॲटो रिक्षा, हौदा रिक्षा, मोटारसायकलवरुन भाजी नेऊन ती नागरीकांच्या दारात विक्री करण्याचा प्रयत्न केला. उपनगरात काही विक्रेते एकाच ठिकाणी बसून भाजी विकताना दिसले. कडकडीत लॉकडाऊन सुरु होऊन सहाच दिवस झाले असल्यामुळे नागरीकांना फारशा काही गैरसोयी जाणवल्या नाहीत.
दवाखान्यात निघालोय असे सांगत घराबाहेर पडणारे नागरीक रस्त्यावर येत आहेत. पण चौकाचौकात बंदोबस्तासाठी असलेले पोलिस त्यांना अडवून त्यांची चौकशी करतात. खासगी रुग्णालयांनी रुग्णांच्या जवळच्या नातेवाईकांना ओळखपत्रे दिली आहेत. पोलिसांनी अडविले की ती दाखविली जात आहेत.