शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीला काळम्मावाडीतून थेट पाणी

By admin | Updated: December 23, 2014 00:44 IST

लवकरच बैठक : पंचगंगा नदी शुद्धीकरणासाठी आराखडा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

ाागपूर : पंचगंगा नदीतून इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा होतो. मात्र, कोल्हापूर शहरातील सांडपाणी नदीत सोडण्यात येत असल्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. याची दखल घेत पंचगंगा नदी शुद्धीकरणासाठी एक आराखडा तयार केला जाईल व त्यासाठी निधी कुठून उपलब्ध करून देता येईल ते पाहू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा व पंचगंगा नदीतील पाणी दूषित झाले असून काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी सुरेश हाळवणकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. यासंबंधीचा ६३१ कोटी ८५ लाख रुपयांचा प्रस्ताव राज्यस्तरीय नोडल यंत्रणा तसेच नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडे सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित योजनेला विशेष बाब म्हणून मंजुरी देण्याची मागणी हाळवणकर यांनी केली. संबंधित प्रस्तावाबाबत काही त्रुटींची पूर्तता करण्यास नगर परिषद प्रशासन संचालनालयातर्फे इचलकरंजी नगर परिषदेस कळविण्यात आले असतानाही नगर परिषदेने त्रुटींची पूर्तता केली नाही. आता नगर परिषदेस त्रुटी दूर करण्यास सांगून राज्य नोडल एजन्सीला संबंधित प्रस्तावास तांत्रिक मंजुरी देण्यास सांगितले जाईल. यानंतर शासनाकडे प्रस्ताव येताच १५ दिवसांच्या आत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले. नदीत सांडपाणी सोडणाऱ्यांना नोटीसा बजावणारशिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरातील सांडपाणी पंचगंगा नदीत सोडले जात असल्याचे सांगून तेथे ट्रीटमेंट प्लांट उभारण्याची गरज व्यक्त केली. यावर नदीत सांडपाणी सोडणारे उद्योग व प्रतिष्ठानांना नोटीस बजावली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.