बेळगावात सावत्र आईकडून चिमुरडीचा खून, आजी-आजोबांनी केली पोलिसांत तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 12:20 IST2024-05-21T12:19:45+5:302024-05-21T12:20:46+5:30

बेळगाव : तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथे वास्तव्यास असणाऱ्या बालिकेचा तिच्याच सावत्र आईने खून केल्याचा आरोप मृत बालिकेच्या आजी-आजोबांनी केला ...

Little girl killed by step mother in Belgaum, grandparents file police complaint | बेळगावात सावत्र आईकडून चिमुरडीचा खून, आजी-आजोबांनी केली पोलिसांत तक्रार 

बेळगावात सावत्र आईकडून चिमुरडीचा खून, आजी-आजोबांनी केली पोलिसांत तक्रार 

बेळगाव : तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथे वास्तव्यास असणाऱ्या बालिकेचा तिच्याच सावत्र आईने खून केल्याचा आरोप मृत बालिकेच्या आजी-आजोबांनी केला आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून, आजी-आजोबांनी सावत्र आईच्या विरोधात येथील एपीएमसी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

समृद्धी रायण्णा हंपन्नवर (वय ४) असे या निरागस मुलीचे नाव आहे. समृद्धी ही सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घरामध्ये खेळत असताना अचानक कोसळली. तेव्हा बरे वाटत नसेल म्हणून उपचारासाठी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयाकडे घेऊन जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. समृद्धीच्या मृत्यूची बातमी मिळताच तिचे आजोबा-आजी आणि नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली.

यावेळी मृत समृद्धीच्या नातेवाइकांनी या मृत्यूला तिची सावत्र आई सपना रायण्णा हंपन्नवर कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप केला. दोन वर्षांपूर्वी २०२१ मध्ये हुंड्यासाठी समृद्धीची आई भारती हंपन्नवर हिचा खून झाला होता. आता सावत्र आई सपना हिने चार वर्षांच्या समृद्धीचा खून केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मयत समृद्धीच्या एका नातेवाइकाने तिला रविवारी रात्री उलटी आणि शौचाला झाले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी बरे वाटू लागल्याने घरात खेळत असताना ती अचानक खाली कोसळली आणि उपचारासाठी हॉस्पिटलला नेत असताना तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Little girl killed by step mother in Belgaum, grandparents file police complaint