Kolhapur: गुजरातला निघालेली १ कोटीची दारु पकडली, अणुस्कुराजवळ भरारी पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 11:59 IST2026-01-23T11:58:10+5:302026-01-23T11:59:13+5:30

आठवड्यात दुसरी मोठी कारवाई

Liquor worth 1 crore bound for Gujarat seized in Kolhapur | Kolhapur: गुजरातला निघालेली १ कोटीची दारु पकडली, अणुस्कुराजवळ भरारी पथकाची कारवाई

Kolhapur: गुजरातला निघालेली १ कोटीची दारु पकडली, अणुस्कुराजवळ भरारी पथकाची कारवाई

कोल्हापूर : गोव्यातून अणुस्कुरा घाटमार्गे ट्रकमधून आणलेली एक कोटी १५ लाख २० हजारांची बनावट दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी (दि. २१) सकाळी अणुस्कुरा (ता. शाहूवाडी) गावाजवळ पकडली. ट्रकचालक रामजीवन वीरधाराम बिष्णोई (वय २६, रा. बाडमेर, राजस्थान) याला अटक केली.

गोव्यातून खरेदी केलेली दारू मलकापूर, कराडमार्गे पुढे गुजरातला घेऊन जाणार होतो, अशी कबुली त्याने उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दिली. एकाच आठवड्यात ही दुसरी मोठी कारवाई झाली.

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बनावट दारूची तस्करी वाढली आहे. याला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची संशयास्पद वाहनांवर नजर आहे. अणुस्कुरा घाटमार्गे बनावट दारू जिल्ह्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर येथील भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक सदानंद मस्करे यांच्या पथकाची अणुस्कुरा घाटातील वाहनांवर नजर होती. 

बुधवारी सकाळी त्यांनी अणुस्कुरा गावाजवळ एक संशयित ट्रक अडवून झडती घेतली असता त्यात एक कोटी १५ लाख २० हजार रुपये किमतीचा गोव्यात तयार केलेला बनावट दारूचा साठा आढळला. दारूच्या बाटल्यांचे १६० बॉक्स आणि १५ लाख ३० हजार रुपये किमतीचा ट्रक पथकाने जप्त केला.

पथकाने ट्रकचालक बिष्णोई याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याने गोव्यातून कोणाकडून दारूची खरेदी केली आणि गुजरातमध्ये कोणाला पोहोचवणार होता, याचा तपास सुरू असल्याचे अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी सांगितले. निरीक्षक मस्करे यांच्यासह दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे, अजय वाघमारे, सहायक दुय्यम निरीक्षक कांचन सरगर, जवान विलास पवार, सचिन लोंढे, विशाल भोई, आदींच्या पथकाने कारवाई केली.

बनावट दारू

पथकाने जप्त केलेली दारू गोव्यात तयार झाली असून, ती बनावट आहे. बाटलीच्या लेबलवर बॅच नंबर नाही. तयार करणाऱ्या उत्पादकाची माहिती नाही. उत्पादन कधी केले याचा तपशील नाही. त्यामुळे ही बनावट दारू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

आठवड्यात दुसरी मोठी कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. १८) देवगड-निपाणी मार्गावर आणूर रोड येथे पकडलेल्या ट्रकमधून ४० लाखांची बनावट दारू जप्त केली होती. महाराष्ट्राचे लेबल लावलेली ती दारू नागपूरला पोहोचवली जाणार होती.

Web Title : कोल्हापुर: गुजरात जा रही एक करोड़ की शराब जब्त

Web Summary : कोल्हापुर में आबकारी अधिकारियों ने अणुस्कुरा के पास 1.15 करोड़ रुपये की अवैध शराब जब्त की और ट्रक चालक को गिरफ्तार किया। गोवा से निकली शराब गुजरात जा रही थी। इस सप्ताह यह दूसरी बड़ी जब्ती है, जो स्थानीय चुनावों के दौरान बढ़ी सतर्कता को उजागर करती है।

Web Title : Kolhapur: Crores Worth Liquor Seized En Route to Gujarat

Web Summary : Kolhapur excise officials seized ₹1.15 crore worth of illicit liquor near Anuskura, arresting the truck driver. The liquor, originating from Goa, was destined for Gujarat. This is the second major seizure this week, highlighting increased vigilance during local elections.