शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

तिळगुळाचा गोडवा जीवनात येऊ दे...- मकरसंक्रांती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 1:10 PM

गुळाचा गोडवा ओठांवर येऊ दे, मनातील कडवटपणा बाहेर जाऊ दे. दु:ख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा; जीवन असावे तिळगुळासारखे... अशा गोड शुभेच्छा एकमेकांना देत बुधवारी मकरसंक्रांती हा नववर्षातील पहिला सण साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देतिळगुळाचा गोडवा जीवनात येऊ दे.. मकरसंक्रांती उत्साहात

कोल्हापूर : गुळाचा गोडवा ओठांवर येऊ दे, मनातील कडवटपणा बाहेर जाऊ दे. दु:ख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा; जीवन असावे तिळगुळासारखे... अशा गोड शुभेच्छा एकमेकांना देत बुधवारी मकरसंक्रांती हा नववर्षातील पहिला सण साजरा करण्यात आला.यानिमित्ताने घरोघरी पुरणपोळीचा बेत रंगला; तर दिवसभरात तिळगुळाची देवाणघेवाण करीत नात्यांमधला गोडवा अधिकच वाढला. सणानिमित्त श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती.मकरसंक्रांती म्हणजे दु:खद अनुभवांचा कडवटपणा दूर करून आयुष्यात गुळाचा गोडवा आणण्याचा संदेश देणारा सण. सूर्याचा मकर राशीत प्रवेश... थंडीच्या दिवसांत पोषक, आरोग्यदायी अन्नाचे सेवन करायला लावणारा आणि दुसरीकडे उन्हाळ्याची चाहूल देणारा हा दिवस. दोन दिवसांचा हा उत्सव. भोगीला बाजरीची भाकरी, रानभाज्यांचे सेवन आणि संक्रांतीला पुरणपोळीचे मिष्टान्न भोजन असा हा संयोग साधत बुधवारी कोल्हापूरकरांनी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.सकाळपासूनच घरोघरी सणाची लगबग सुरू होती. घरादाराची स्वच्छता झाली. अंगणात सप्तरंगांची रांगोळी सजली. देवदेवतांचे पूजन झाले. त्यानंतर सुवासिनींनी औसापूजन केले. पाच सुगड्यांना रंगवून त्यात ऊस, बोरे, गाजर, शेंग हे पूजासाहित्य घालून या सुगड्यांचे पूजन करण्यात आले. घराघरांत पुरणपोळीचा दरवळ सुटला.

या दिवशी काळे कपडे परिधान केले जातात. महिला-मुलींनी काळ्या साड्या, कुर्तीज, वनपीसला प्राधान्य दिले. पुरुषांनीही काळ्या रंगाचे कपडे घातले होते. यानंतर सर्वांनी एकमेकांना तिळगूळ देत ‘तिळगूळ घ्या... गोड बोला’चा संदेश दिला.

सणाच्या या गोडव्याने सगळ्यांचा दिवस आनंदमयी गेला. सणानिमित्ताने अनेक शाळांमध्ये तिळगूळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक कपडे घातले होते. महाविद्यालयांमध्ये ‘ट्रॅडिशनल डे’ साजरा करण्यात आला. दिवसभर फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्स अ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांवर शुभेच्छा संदेश पाठविले जात होते.हलव्याचे दागिने... बोरन्हाणे अन् हळदी-कुंकूमकरसंक्रांतीला पाच वर्षांच्या आतील बालकांना बोरन्हाणे घातले जाते. बालकांना हलव्याचे दागिने घातले जातात. बोरे, ऊस, गाजर, तिळगूळ, चिरमुरे एकत्र करून मापट्याने ते मिश्रण बालकांच्या डोक्यावरून घातले जाते. नंतर हे सगळे बच्चेकंपनीला खायला दिले जाते.

नवविवाहित सुवासिनींनाही हौसेने हलव्याचे दागिने घालून तिचे औक्षण केले जाते. घरोघरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम रंगतो. वाण म्हणून घरगुती वापराचे साहित्य दिले जाते. रथसप्तमीपर्यंत हा सोहळा रंगतो. 

 

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीkolhapurकोल्हापूर