वारणानगर : जाखले (ता.पन्हाळा) येथील एका शेतातील विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याच्या दोन पिल्लांना सुमारे दोन तासांच्या थरारक प्रयत्नानंतर पकडण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना अखेर यश आले. शुक्रवारी सांयकाळपर्यंत थराराचा हा प्रसंग उशिरापर्यंत विहिरीवर सुरू होता.जाखले येथील जामदार मळ्यातील शरद पाटील यांच्या विहिरीमध्ये बिबट्याची दोन पिल्ले पडल्याची घटना शारदा पाटील यांना आढळली. याची माहिती पोलिस पाटील अजित पाटील यांना कळविली. यानंतर, वनविभागाचे वनरक्षक योगेश पाटील तातडीने घटनास्थळी पोहोचले. बिबट्याची पिल्ले विहिरीत पडल्याची बातमी गावात पसरताच, नागरिकांनी विहिरीवर मोठी गर्दी केली. वनविभागाच्या आरआरटी या रेस्क्यू टीमला पाचारण केले.सायंकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांयकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या पिल्लांना पकडण्यासाठी सापळा विहिरीत सोडला आणि रात्री उशिरापर्यंत पिल्लांना सापळ्याच्या साह्याने पकडण्याचे प्रयत्न सुरू होते. विहिरीच्या काठावर झुडपे असल्याने कर्मचारी आणि नागरिकांनी स्वच्छता केल्यामुळे विहिरीत जाळी व पिंजरा सोडण्यास मदत झाली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अखेर दोन तासांच्या अथक आणि थरारक प्रयत्नानंतर नागरिकांच्या मदतीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या पिल्लांना जाळीद्वारे पकडले. ही पिल्ली साधारणपणे अंदाजे आठ नऊ महिने वयाची असल्याचे सांगण्यात आले.यावेळी वनविभागाच्या आरआरटी पथक कोल्हापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहा.वनसंरक्षक वन व कॅम्प कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा परिक्षेत्र अधिकारी अजित माळी, वनपाल सागर पटकरे, राक्षीचे वनरक्षक योगेश पाटील, प्रदीप सुतार, संतोष बिरंबोळे, आरआरटी टीम पन्हाळा व कोल्हापूर यांच्या पथकाने मोहीम फत्ते केली.
Web Summary : Forest officials rescued two leopard cubs from a well in Jakale, Kolhapur, after a dramatic two-hour rescue operation. The cubs, around eight to nine months old, were safely captured with the help of villagers and forest department staff.
Web Summary : कोल्हापुर के जाखले में वन विभाग के कर्मचारियों ने दो घंटे के रोमांचक अभियान के बाद कुएं में गिरे तेंदुए के दो बच्चों को बचाया। ग्रामीणों और वन विभाग के कर्मचारियों की मदद से लगभग आठ-नौ महीने के बच्चों को सुरक्षित पकड़ लिया गया।