शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

‘उगम ते संगम’ अशी परिक्रमा राबविणार -- भूमाता संघटनेचे नेते व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्याशी साधलेला थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 6:45 PM

जनमताचा रेटा उभारून पंचगंगा प्रदूषणमुक्ती शक्य आहे. त्यासाठी ४ ते ७ जानेवारीदरम्यान ‘संगम ते उगम’ अशी पंचगंगेच्या काठावरून पायी जागर यात्रा निघत आहे. या निमित्ताने भूमाता संघटनेचे नेते व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्याशी साधलेला थेट संवाद...

जनमताचा रेटा उभारून पंचगंगा प्रदूषणमुक्ती शक्य आहे. त्यासाठी ४ ते ७ जानेवारीदरम्यान ‘संगम ते उगम’ अशी पंचगंगेच्या काठावरून पायी जागर यात्रा निघत आहे. या निमित्ताने भूमाता संघटनेचे नेते व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्याशी साधलेला थेट संवाद...

प्रश्न : पंचगंगा प्रदूषणमुक्ती हा विषय आता का घ्यावा वाटला?उत्तर : मी शिरोळचा रहिवासी आहे. नदी प्रदूषणाची सर्वाधिक झळ याच तालुक्याला बसते. महिनाभरापूर्वी आमच्याच तालुक्यातील नांदणी या गावातील भाजीपाला खाल्ला तर कॅन्सर होतो, अशी आवई उठवली गेली, याचे मला फार वाईट वाटले. आमचा काही दोष नसताना उगीच बदनामी होत असल्याने याविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय घेतला. योगायोग असा की, मी चालवत असलेली ‘भूमाता’ ही संघटना याच वर्षी २७ जानेवारीला स्थापनेची २५ वर्षे साजरी करीत आहे. आपल्याच गावचा

प्रश्न सोडवून विधायक पद्धतीने रौप्यमहोत्सव साजरा करूया, म्हणून हा विषय हातात घेतला.प्रश्न : यासाठी वेगळा काही अभ्यास केला का?उत्तर : ज्या पंचगंगेत वीसएक वर्षांपूर्वी आपण पोहलो, पाणी प्यायलो, तेथे आता रक्षाविसर्जन करण्यासाठीही लोक पाण्यात उतरताना धजावत नाहीत, हे पाहिल्यानंतर ‘संगम ते उगम’ हा उपक्रम हाती घेण्याआधी सर्वंकष तयारी सुरू केली. प्रदूषणाच्या संदर्भात आतापर्यंत झालेले सर्व्हे, कोर्टाने दिलेले आदेश, विविध संस्थांचे निष्कर्षासह अहवाल या सर्वांचे वाचन करतानाच या विषयात काम करणाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या उपक्रमाची दिशा स्पष्ट केली. सर्व प्रकारची संख्यात्मक व विश्लेषणात्मक माहिती जमविली.

प्रश्न : संगम ते उगमच असा मार्ग निवडण्यामागे काय कारण?उत्तर : आतापर्यंत ‘उगम ते संगम’ अशी पंचगंगेची परिक्रमा झाली आहे. उगमाला स्वच्छ असणारी नदी संगमाला मात्र अतिप्रदूषित बनते. त्यामुळे प्रदूषणाची दाहकता कळावी या हेतूने ‘संगम ते उगम’ असा पायी दिंडीचा मार्ग निवडला. कुरुंदवाड ते प्रयाग चिखली या मार्गावर पंचगंगेत ७५० छोटे-मोठे प्रवाह येऊन मिसळतात, तर अतिप्रदूषण करणारी २५० ठिकाणे आहेत. यांना भेट देऊन पाण्याचे नमुने घेऊन त्याचे पुढे पृथक्करण करून पुढील जनजागृती केली जाणार आहे.

प्रश्न : महिला आणि तरुणांनाच निवडण्यामागचे कारण?उत्तर : प्रदूषणाची सर्वांत जास्त झळ महिलांना बसते. त्यांच्याकडून प्रदूषणाला हातभारही लावला जातो. त्यामुळे या महिलांचे प्रबोधन करण्यासाठी म्हणून यांनाच या चळवळीत अधिक प्रमाणात सहभागी करून घेतले जाणार आहे. तरुणांकडे कल्पकता असते, जीव तोडून राबण्याची तयारी असते; त्यामुळे तरुणांनीच या उपक्रमात अधिकाधिक सहभागी व्हावे, यासाठी पंचगंगा खोºयातील महाविद्यालयांना भेटी देऊन आवाहन करीत आहे. याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

प्रश्न : राजकारणविरहित उपक्रम आहे; मग खासदार उदयनराजे व आमदार उल्हास पाटील यांना घेण्यामागचे प्रयोजन?उत्तर : ते बरोबर आहे. राजकारण बाजूला ठेवले आहे. जनतेने मनात आणले तर कोणतेही प्रश्न सुटू शकतात यावर माझा पूर्ण विश्वास आहे. हा विचार खासदार उदयनराजे व आमदार उल्हास पाटील यांनाही पटला. विशेष म्हणजे हे दोन्हीही लोकप्रतिनिधी जनतेचाच आधी विचार करतात. पूर्णपणे नि:स्वार्थी आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी असल्यानेच त्यांना आपल्यासोबत घेतले आहे. आमदार उल्हास पाटील विधानसभेतही प्रदूषणावर आक्रमक मांडणी करतात. त्यांनी प्रदूषणाची झळ सोसली आहे.

प्रश्न : उपक्रमाची पुढील दिशा काय असणार?४ ते ७ जानेवारी अशी कुरुंदवाड ते प्रयाग चिखली अशी संगम ते उगम पायी यात्रा काढून आम्ही थांबणार नाही. नदी प्रदूषणमुक्त होईपर्यंत काय आणि कधी करायचे याबाबतचा वर्षभराचा पूर्ण आराखडा तयार केला आहे. शासनाकडे काय मागायचे, जनतेला काय सांगायचे येथपासूनच प्रगत देशामध्ये कशा प्रकारे प्रदूषणमुक्ती होते येथपर्यंत सर्व काही तयार आहे. कोल्हापुरी पाणी पूर्वीपासूनच चांगले होते, ते आता बिघडले आहे. कोल्हापुरी गूळ, चप्पल याप्रमाणे कोल्हापूरचे पाणी जगात भारी ठरविण्याचे माझे स्वप्न आहे.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषणkolhapurकोल्हापूर