शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कायदा हातात नको; डोक्यात घ्या

By admin | Updated: December 2, 2014 00:14 IST

वाहतूक नियंत्रण शाखेची कारवाई : वाहनधारकांची बेशिस्त वाहतूक समस्येचे मूळ कारण

कोल्हापूर : वेळोवेळी शासनाकडून होणारी वाहनांसंदर्भात जनजागृती...या जनजागृतीकडे वाहनचालकांकडून होणारी डोळेझाक अशा विविध कारणांमुळे शहरातील वाहनचालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे वाहनचालकांना कायदा हातात घेऊ नकोस, वाहतुकीचे नियम पाळून ते डोक्यात घ्या, अशी म्हणण्याची वेळ आता त्यांच्यावर येत आहे.शहरात सातत्याने होणाऱ्या चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसांत शहर वाहतूक नियंत्रण शाखेने शहरात विविध ठिकाणी नंबर नसलेल्या वाहनांवर, विनापरवाना व फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम २८ ते ३० नोव्हेंबरअखेर राबविली होती. तीन दिवसांत ५०८ केसेसमधून ५० हजार ८०० रुपये दंड वाहनधारकांकडून वसूल केला आहे.शहरातील वाहनचालकांनी शासनाच्या नियमानुसार नंबरप्लेट केली पाहिजे. मात्र, काहीजण त्याचा गैरवापर करताना दिसतात. त्यांच्यावर केंद्रीय मोटार वाहन कायदा नियम १९८९ नुसार कारवाई होते. गत नोव्हेंबर महिन्यात अडीचशे केसेसमधून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच दुचाकी व चारचाकी घेणाऱ्या ग्राहकाला जोपर्यंत सर्व कागदपत्रे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत डिलर्सनी गाड्या ताब्यात देऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. तरीही काही ग्राहक पासिंग व नंबरप्लेट न टाकताच गाडी फिरवितात. समजा, एखाद्या वाहनचालकाचा अपघात झाल्यास अथवा गाडी चोरीला गेल्यास त्याला शासनाकडून मिळणाऱ्या लाभाला मुकावे लागेल. दरम्यान, ११ महिन्यांत अवैध प्रवासी वाहतूक प्रवास केल्याबद्दल १०५ केसेस करण्यात आला असून, त्यामधून शासनाच्या तिजोरीत एक लाख २१ हजार ६०० रुपये जमा झाले आहेत. त्याच्यावर मोटार वाहन कायदा १९८८ प्रमाणे ६६ (१)१९२ (अ) नुसार कारवाई केली जाते. या वाहनधारकांना न्यायालयाकडून दंड होतो. त्याचबरोबर मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांकडून एक लाख २३ हजार ५०० रुपयांचा दंड १३२ केसेसमधून वसूल करण्यात आला आहे. मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे त्यांच्यावर कारवाई होते.फॅन्सी नंबरप्लेटचे फॅडफॅन्सी नंबरप्लेट करण्यात तरुणाई पुढे आहे. गत महिन्यात १७७ केसेसमधून ७० हजार ७०० रुपये दंडातून शासनाला महसूल मिळाला आहे. केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ नुसार अशा फॅन्सी नंबरप्लेटधारकांवर कारवाई होते.वाहनधारकांनी नियमानुसार नंबरप्लेट केली पाहिजे. नियम पाळून दंडात्मक कारवाई टाळली पाहिजे. एकंदरीत, वाहनांचे जे नियम आहेत त्याचे तंतोतंत पालन करावे.- रमेश खुणे, साहाय्यक वाहतूक पोलीस निरीक्षक, कोल्हापूर.वाहनचालकांनी ही काळजी घ्यावीपालकांनी मुलांना ( १८ वर्षांखालील) गाड्या देऊ नयेतवाहन कागदपत्रांच्या झेरॉक्स स्वत:जवळ ठेवाअधिकृत नंबरप्लेट करून घेणे (आरटीओंच्या नियमांनुसार)