शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलने डिसकनेक्ट केली लॅँडलाईन

By admin | Updated: December 9, 2014 23:55 IST

दूरध्वनी कनेक्शन घटले : जिल्ह्यात दर महिन्याला होतात सोळाशे कनेक्शन बंद

संदीप खवळे - कोल्हापूर -दूरसंचार क्षेत्रातील मैलाचा दगड ठरलेल्या दूरध्वनीचे अस्तित्वच आता आता नाममात्र राहण्याची वेळ आली आहे. मोबाईलचा वाढता वापर, त्यातील नवीन तंत्रज्ञान आणि इंटरनेटची सुविधा यामुळे देशातील लँडलाईन कनेक्शनना घरघर लागली आहे़ लॅँडलाईन कनेक्शन बंद होण्याचा वेग इतका आहे की, येत्या काही वर्षांत लॅँडलाईनचा वापर केवळ कार्यालये आणि ब्रॉडबॅँड कनेक्शनची आवश्यकता असलेल्या ठिकाणीच होण्याची चिन्हे आहेत. या बदलाला कोल्हापूर जिल्हाही अपवाद नाही... गेल्या तीस वर्षांत एस़टी़डी़, कॉईन बॉक्स, तसेच घरातील दूरध्वनी या मार्गांनी टेलिफोनचा वापर व्हायचा़ शहर असो वा ग्रामीण दूरध्वनीमुळे तो जोडला गेला होता. जागतिकीकरणानंतर खासगी कंपन्याही या क्षेत्रात उतरल्या आणि दराची स्पर्धा वाढून ग्राहकांचा फायदा झाला़ यामुळे दूरध्वनींची संख्या वाढत गेली़; पण २००५ नंतर मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे ही संख्या कमी होत गेली़ ही बाब दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘बीएसएनएल’च्या नोव्हेंबर २०१४ च्या कोल्हापूर जिल्ह्याच्या अहवालात दिसून येते़ बीएसएनएल दूरध्वनी कनेक्शनची कोल्हापूर जिल्ह्यातील संख्या नोव्हेंबर २०१४ अखेरीस कमी होऊन १०१५५२ पर्यंत आली आहे़ इतर कंपन्यांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी ‘बीएसएनएल’ने दूरध्वनीबरोबरच ब्राँडबॅँड तसेच ‘तरंग’ सेवाही सुरू केली आहे़ यातील ब्राँडबॅँड कनेक्शनमध्ये मार्च २०१४ च्या तुलनेत फारशी घट नाही़ जिथे केबल पोहोचू शकत नाहीत, अशा दुर्गम भागात ‘बीएसएनएल’ने तरंग सेवा सुरू केली होती़ या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला होता़; पण मोबाईल टॉवरने ‘तरंग’ सेवेलाही खो दिला आहे़ तरंग कनेक्शनही नऊ हजारांवरून साडेसहा हजारांच्या आसपास आलेली आहेत़ मोबाईलवरील इंटरनेट सेवा, तंत्रज्ञानातील स्पर्धेमुळे दूरध्वनींची संख्या झपाट्याने कमी होत आहे़ दर महिन्याला सरासरी सोळाशे कनेक्शन्स बंद होत आहेत़ त्यामुळे दूरध्वनीचा वापर हा कार्यालये आणि ब्राँडबॅँडपुरताच मर्यादित होऊन दूरध्वनीचा खणखणाट इतिहासजमा होण्याची वेळ आली आहे.गेल्या तीस वर्षांत ‘बीएसएनएल’ने दूरध्वनी सेवा पोहोचविण्यासाठी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे़ दूरध्वनी जोडणीसाठी आवश्यक असलेली आॅप्टिकल फायबर केबल व अन्य साधनसामग्री यांसाठी अब्जावधी रुपये खर्च केले आहेत़ बीएसएनएलची जिल्ह्यात ३०८ एक्स्चेंज आहेत. याच्या माध्यमातून शहर तसेच ग्रामीण भाागातील लोकांना दूरध्वनीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे; डिसकनेक्ट होणारी संख्या हा चिंतेचा विषय आहे. दरम्यान, केंद्र शासनाने नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क या योजनेद्वारे सुमारे अडीच लाख ग्रामपंचायतींना ब्राँडबॅँड कनेक्शन देण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. हेच आशादायी चित्र आहे.दर महिन्याला सरासरी सोळाशे दूरध्वनी कनेक्शन बंद होत आहेत. मोबाईलचा वाढता वापर, बाजारातील स्पर्धा ही यामागची प्रमुख कारणे आहेत. मोबाईलने लॅँडलाईन कनेक्शनला एक मोठे आव्हानच उभे केले आहे. मोबाईलचा वाढता वापर ओळखून दूरध्वनीसाठी लागणाऱ्या आॅप्टिकल केबलची पुरेशी निर्मितीही कंपन्यांकडून होत नाही. - एस. डी. हजारे,सहायक महाप्रबंधक (योजना), बीएसएनएल, कोल्हापूर.