शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील अंबाबाई विकास आराखडा भूसंपादन मार्चपासून सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:46 IST

मिळकतधारकांशी चर्चा करूनच निर्णय : बिंदू चौक ते मेन राजाराम परिसर संपादनाचा विचार

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत केल्या जाणाऱ्या भूसंपादनासाठीची प्रक्रिया मार्चपासून सुरू होणार आहे. नगरविकास विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावावर आठवड्याभरात मंजुरी आल्यानंतर परिसरातील मिळकतधारकांशी संपादनाबाबत चर्चा केली जाणार आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!पुनर्वसन की नुकसानभरपाईची रक्कम या दोन पर्यायांवर नागरिकांच्या मागणीनुसार निर्णय घेतले जातील. याशिवाय आराखड्यात बदल करून बिंदू चौक ते मेन राजाराम हायस्कूलपर्यंतचा परिसरदेखील संपादित करायचा. हा रस्ता हेरिटेज पथ म्हणून विकसित करून खाली दोन-तीन मजली पार्किंग आणि वर तेथील व्यावसायिक, रहिवाशांचे पुनर्वसन असाही विचार सुरू आहे.श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत मंदिराच्या भोवतीच्या ९ एकर परिसरातील मिळकतींचे संपादन केले जाणार आहे. ते कसे करता येईल यावर जिल्हास्तरीय समितीने आपला अहवाल राज्य शासन स्तरावर नियुक्त केलेल्या भूसंपादन समितीला पाठविला आहे. पुढील आठवड्याभरात त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.मंजुरी येताच संपादित केल्या जाणाऱ्या जागांचे प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण, मोजणी आणि नागरिकांशी संवाद या तीन पातळीवर मार्च-एप्रिलमध्ये काम सुरू होणार आहे. या सर्वेक्षणामुळे किती जमीन संपादित होते. किती मिळकतदार बाधित होतात याचा नेमका आकडा समजणार आहे.

मिळकतधारकांपुढे दोन पर्यायनुकसानभरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने नगरविकास विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला पुनर्वसन किंवा रोख रक्कम असे दोन पर्याय दिले आहेत.अंबाबाई मंदिर परिसरात रहिवाशांपेक्षा व्यावसायिकांची संख्या जास्त असून, त्यांचे तसेच काही रहिवासी अंबाबाईच्या नित्य नैमित्तिक विधींशी संबंधित असल्याने त्यांचेही तेथेच पुनर्वसन करावे लागणार आहे. नागरिकांनी रोख रक्कम किंवा पुनर्वसन यापैकी एक पर्याय निवडायचा आहे.

आराखड्याचे नागरिकांपुढे सादरीकरणअंबाबाई आराखड्यात अनेक बदल आणि दुरुस्त्या केल्या जात आहेत. अडचणीचे, सुरक्षिततेच्या दृष्टीने धोक्याच्या ठरणाऱ्या बाबी काढून नव्या सोयीच्या बाबींचा समावेश केला जाणार आहे. या सर्व बदलांचा सविस्तर आराखडा मिळकतधारकांसमोर सादर केला जाणार आहे. त्यांची मते जाणून घेऊनच आराखड्याचे पुढचे पाऊल टाकले जाईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केले.

बिंदू चौक ते मेन राजाराम परिसर हेरिटेज पथ

  • बिंदू चौक सबजेल हलवून ही इमारत भाविकांच्या सोयीसाठी वापरता येईल.
  • बिंदू चौक ते मेन राजाराम हायस्कूलपर्यंतचा रस्ता अरुंद असून, वाहने व भाविकांमुळे कायमच येथे वाहतुकीची कोंडी होते.
  • हा रस्ता हेरिटेज पथ करून खाली पार्किंग आणि वर मिळकतधारकांचे पुनर्वसन असा विचार आहे. त्यामुळे पार्किंगची सोय होईल. भाविकांना सोयीसुविधा मिळतील. चालत मंदिरापर्यंत जाता येईल, मिळकतधारकांनाही बाधा येणार नाही, असा विचार करून मिळकतधारकांशी चर्चा केली जाणार आहे.

दर्शन मंडप सरलष्करमध्येअंबाबाई मंदिराच्या विद्यापीठ गेट येथील नियोजित भूमिगत पार्किंग व दर्शन मंडप रद्द करण्यात आले आहे. ही परिसर मोकळाच ठेवला जाईल. दर्शन मंडप सरलष्कर भवनमध्ये होईल. बिंदू चौकातील जमीन संपादित करून तेथे पार्किंग वाढवले जाईल.

प्राधान्यक्रम असा..

  • सरलष्करमध्ये दर्शन मंडप साकारणे
  • पार्कींग वाढवणे
  • मंदिराभोवतीच्या मिळकतींचे संपादन
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Ambabai Temple Development Plan: Land Acquisition to Begin in March

Web Summary : Ambabai Temple development plan in Kolhapur is set to begin land acquisition in March. Property owners will have options for resettlement or compensation. A heritage path development is also proposed, including parking and rehabilitation.