कोल्हापूर जिल्ह्यात व्हेंटिलेटरचा तुटवडा, रुग्णांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 01:18 AM2020-09-02T01:18:46+5:302020-09-02T01:19:33+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांचा व मृत्यूचा आकडा वाढतच आहे. ही चिंता वाढविणारी बाब आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत सुमारे आठ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत,

Lack of ventilator in Kolhapur district, inconvenience to patients | कोल्हापूर जिल्ह्यात व्हेंटिलेटरचा तुटवडा, रुग्णांची गैरसोय

कोल्हापूर जिल्ह्यात व्हेंटिलेटरचा तुटवडा, रुग्णांची गैरसोय

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांसाठी व्हेंटिलेटरचा तुटवडा आजही जाणवत आहे. सीपीआरमध्ये अपुऱ्या व्हेंटिलेटरमुळे रोज किमान १२ ते १५ कोरोनाग्रस्त रुग्णांची गैरसोय होत आहे. व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेतील रुग्णांची प्रकृती स्थिर असेल तर त्याला आॅक्सिजन बेडवर घेतले जात आहे. रुग्णांना व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची धावाधाव सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांचा व मृत्यूचा आकडा वाढतच आहे. ही चिंता वाढविणारी बाब आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत सुमारे आठ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत; तर मृतांचा आकडा हा सुमारे ६९९ वर पोहोचला आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी अत्यवस्थ असणाºया तब्बल २८५ रुग्Þणांवर सीपीआर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सीपीआर रुग्णालयाची एकूण बेड क्षमता ही ४५९ आहे; तर त्यांपैकी ३०२ बेड आॅक्सिजनयुक्त करण्यात आले आहेत. आणखी ८५ बेड वाढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सीपीआर रुग्Þणालयात सुमारे २० हजार लिटर आॅक्सिजनची टाकी कार्यान्वित केल्यामुळे रुग्णांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे; पण तरीही अद्याप व्हेंटिलेटर व आॅक्सिजन बेडची कमतरता भासत आहे.

सीपीआरमध्ये सध्या ५४ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. ते सर्व फुल्ल असल्यामुळे मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. रोज किमान १२ ते १५ नव्या रुग्णांना त्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यांपैकी एखाद्या रुग्णांची प्रकृती स्थिर झाल्यास त्याला आॅक्सिजन बेडवर घेऊन व्हेंटिलेटर दुसºया रुग्णास देऊन मलमपट्टी केली जात आहे. त्यामुळे अपुºया व्हेंटिलेटरमुळे अनेक गंभीर रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Lack of ventilator in Kolhapur district, inconvenience to patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.