कुरुंदवाडमध्ये आरक्षणामुळे नेत्यांच्या जागा सुना घेणार, तिरंगी लढतीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:39 IST2025-10-07T18:39:03+5:302025-10-07T18:39:19+5:30
राजकीय गट सक्रिय झाले

कुरुंदवाडमध्ये आरक्षणामुळे नेत्यांच्या जागा सुना घेणार, तिरंगी लढतीची शक्यता
कुरुंदवाड : येथील पालिका नगराध्यक्ष आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी पडल्याने शहरातील गटनेते अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख तीनही नेत्यांच्या घरातील महिलांची नावे चर्चेत आली आहेत. त्यामध्ये काँग्रेसकडून योगिणी पाटील, भाजपाकडून मनीषा डांगे, तर यड्रावकर गटाकडून त्रिशला पाटील यांची नावे पुढे आली आहेत. त्यामुळे पालिका निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.
शहरात सध्या जयराम पाटील (काँग्रेस), रामचंद्र डांगे (भाजपा) व रावसाहेब पाटील (राष्ट्रवादी) असे प्रमुख तीन गट आहेत. पालिका निवडणुकीचे संकेत मिळाल्यापासून राजकीय गट सक्रिय झाले होते. गत निवडणुकीत नगराध्यक्ष पद खुल्या गटासाठी होती. त्यामुळे तीनही नेते नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात राहिल्याने तिरंगी लढत झाली होती. यावेळी नगराध्यक्ष आरक्षण काय पडणार याची उत्सुकता गटनेत्यांना लागली होती. सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने आता निवडणुकीत यंदा नेत्यांची जागा सुना घेण्याची शक्यता आहे.