शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाड होणार सीसीटीव्हीत कैद

By admin | Updated: January 19, 2017 00:29 IST

गुन्हेगारी प्रवृत्तीला बसणार आळा : नगराध्यक्ष जयराम पाटील यांचा निर्णय

गणपती कोळी --कुरुंदवाड ---येथील नगरपालिका व लोकसहभागातून शहरात ६३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या कक्षेत येणार असून गुन्हेगारांना आळा बसणार आहे. कुरुंदवाड हे निमशहर असले तरी परिसरातील सत्तावीस गावांची बाजारपेठ आहे. त्यामुळे या शहरात शेतकरी, व्यापारी यांची नेहमी वर्दळ असते. या गर्दीचा गैरफायदा घेत अनेकवेळा महिलांची छेडछाड, चोरी, चेन स्नॅचिंगचे प्रकार घडत असताना पोलिसांना चोर पकडण्याचे आव्हान पेलावे लागत आहे.त्यामुळे अशा गुन्हेगारांना पकडणे व गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शहरात मुख्य चौक, रस्ते, महाविद्यालय, एस.टी.स्टँड अशा भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी नगरपालिकेला कळविले होते. पोलिसांच्या या सूचनेची दखल घेत नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा आर्थिक खर्च असल्याने पोलिस अधिकारी कदम यांनी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, संस्था यांना सीसीटीव्हीसाठी सहभागी होण्याचे आवाहन केल्याने शहरवासीयांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे स्वप्न पुरे होणार आहे. ठेकेदाराकडून पाहणी करण्याचे काम चालू झाले असून, शहर लवकरच सीसीटीव्ही कॅमेराच्या कक्षेत येणार आहे. त्यामुळे महिलांची सुरक्षितता, वाहन पार्किंग शिस्तबद्धता बरोबरच गुन्हेगारांना आळा बसणार आहे.६३ कॅमेरे बसविणारशिवतीर्थ, जुने एस.टी. स्टँड, सन्मित्र चौक, माळभाग, बौध्द समाज मंदिर, थिएटर चौक, नगरपालिका चौक, शेळके मशीद, शिरढोण फाटा, दत्त कॉलेज अशा एकूण २२ ठिकाणी ६३ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.