शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

४० हजार नसल्याने कुणबी दाखले मिळाले नाहीत, कोल्हापुरातील सकल मराठाचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 11:28 AM

कोल्हापूर : कुणबी दाखला काढण्यासाठी ४० हजार रुपये नसल्याने अनेक सर्वसामान्य, गरीब दाखल्यापासून वंचित राहिल्याचा आरोप गुरुवारी सकल मराठा ...

कोल्हापूर : कुणबी दाखला काढण्यासाठी ४० हजार रुपये नसल्याने अनेक सर्वसामान्य, गरीब दाखल्यापासून वंचित राहिल्याचा आरोप गुरुवारी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासमोर केला. यापूर्वीच कुणबीच्या नोंदी शोधून दाखले दिले नसल्याने एका पिढीचे नुकसान झाले आहे. यामुळे शासन, प्रशासनाचा निषेधही त्यांनी नोंदवला. यावेळी शिष्टमंडळातर्फे कुणबी नोंदी शोधण्यासाठी जादाचे मुनष्यबळ द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, कुणबीच्या नोंदी असूनही दाखल्यासाठी चाळीस हजार देणे शक्य नसल्याने अनेकांनी दाखला काढला नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. जिल्ह्यात आतापर्यंत कुणबीच्या पाच हजार नोंद मिळाल्या आहेत. ही संख्या फार कमी आहे. जिल्ह्यातील ८० टक्के मराठा कुणबी होता.मात्र, १९३२ मध्ये जगद्गुरू यांनी केलेल्या आवाहनानुसार मराठा अशी नोंद केली आहे. यामुळे कुणबीच्या नोंदी शोधताना याचा कटाक्षाने विचार करावा. कुटुंबात एकाची कुणबीची नोंद मिळाल्यास सर्वांना दाखला मिळावा. नोंदी शोधण्यासाठी मोडीची कागदपत्रे वाचणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. ‘कु’ म्हणून असलेल्यांच्याही नोंदी घ्याव्यात. शहरासह प्रत्येक तालुक्यात कुणबीच्या नोंदी मोठ्या संख्येने मिळणार आहेत. त्यांचा शोध घेऊन त्याची माहिती वेबसाइटवर ऑनलाइन अपलोड करावी.ॲड. इंदूलकर म्हणाले, यापूर्वीच कुणबीची नोंद शोधून पात्र असणाऱ्यांना दाखला देणे अपेक्षित होते. आता आंदोलनामुळे शासन उशिरा जागे झाले आहे. याआधी ज्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कुणबी दाखले देण्यास दिरंगाई केली आहे, त्यांची खातेनिहाय चौकशी करावी.दिलीप देसाई यांनी नोंदी शोधण्याचे काम गतीने करण्याची मागणी केली. यावेळी बाबा पार्टे, सुनीता पाटील, शैलजा भोसले, उदय लाड, महादेव जाधव, विलास देसाई आदी उपस्थित होते.

शाब्दिक चकमकआता कुणबीच्या नोंदी शोधत आहात, याबद्दल आम्ही तुमचे अभिनंदन नव्हे, तर निषेध करण्यासाठी आलो आहोत. यापूर्वीच हे शोधून दाखले दिले असते, तर पात्र असणाऱ्यांना फायदा झाला असता, असे ॲड. बाबा इंदूलकर यांनी सांगत शासन आणि प्रशासनावर टीका केली. यावर निवासी उपजिल्हाधिकारी तेली यांनी भूतकाळात काय झाले, याचे उत्तर मी कसे देणार? अशी विचारणा केली. याच मुद्यावर उपजिल्हाधिकारी तेली आणि इंदूलकर यांच्यात खडाजंगी झाली. असे बोलणार असाल, तर साहेबांना (जिल्हाधिकाऱ्यांना) भेटा, असे तेली यांनी सांगितले. त्यावर इंदूलकर यांनी कोण साहेब? अशी विचारणा केली.

मोडी वाचणाऱ्या ४२ जणांची नियुक्तीकुणबीची नोंद शोधताना मोडीतील कागदपत्रांचे वाचन करावे लागत आहे. यासाठी उद्यापासूून जिल्ह्यात मोडी वाचणाऱ्या ४२ जणांची नियुक्ती केली जाईल. आणखी मनुष्यबळ वाढवून कुणबीच्या नोंदी शोधून काढण्याचे काम गतिमान केले जाईल, असे आश्वासन तेली यांनी दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCaste certificateजात प्रमाणपत्रreservationआरक्षण