उत्तूरजवळील अपघातात कुडाळच्या युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 13:34 IST2021-01-14T13:32:58+5:302021-01-14T13:34:42+5:30

Accident Kolhapur- उत्तूर-कोल्हापूर रस्त्यावर गावाजवळील धोकादायक वळणावर हुंडाई क्रेटा गाडीच्या अपघातात रोहीत रमाकांत कुडाळकर ( वय २२, कुंभारवाडी -कुडाळ जि. सिंधुदुर्ग ) हा युवक जागीच ठार झाला, तर सिध्देश सुर्यकांत पेडणेकर हा गंभीर जखमी आहे.

Kudal's youth killed in an accident near North | उत्तूरजवळील अपघातात कुडाळच्या युवक ठार

उत्तूरजवळील अपघातात कुडाळच्या युवक ठार

ठळक मुद्देउत्तूरजवळील अपघातात कुडाळच्या युवक ठारएकजण गंभीर जखमी, तिघेजण किरकोळ जखमी

सदाशिव मोरे

आजरा -  उत्तूर-कोल्हापूर रस्त्यावर गावाजवळील धोकादायक वळणावर हुंडाई क्रेटा गाडीच्या अपघातात रोहीत रमाकांत कुडाळकर ( वय २२, कुंभारवाडी -कुडाळ जि. सिंधुदुर्ग ) हा युवक जागीच ठार झाला, तर सिध्देश सुर्यकांत पेडणेकर हा गंभीर जखमी आहे.

रोहीत कुडाळकर यांच्यासह पाचजण फिरण्यासाठी महाबळेश्वर, लोणावळा येथे गेले होते. पर्यटन करुन परत कुडाळ येथे जात असताना उत्तूरजवळील वळणावर रात्री २.३० वा. चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. गाडी रस्त्याकडेला असणाऱ्या दगडाला धडकून उलटली व शंभर मीटर फरफटत गेली.

रोहीत हा गाडीच्या सनराईजमधून रस्त्यावर फेकला गेला. त्यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला, तर जगन्नाथ पेडणेकर यांच्या पोटाला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.गाडीतील ओंकार मेघनाथ वालावलकर रा. नेरुर, बाबूराव सुभाष परब रा. नाबरवाडी, रघुनाथ बाबू कुंभार रा. कुंभारवाडी हे तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.

शवविच्छेदन करुन रोहीत कुडाळकर याचा मृतदेह दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देणेत आला. रोहीत हा आई-वडिलांना एकुलता मुलगा आहे. वडिल आजारी असल्याने घरीच आहेत तर आई घरकाम करते. रोहीत हा कुडाळमध्ये वायफाय कनेक्शनचे काम करतो. अधिक तपास सहायक फौजदार कोचरगी करीत आहेत.

Web Title: Kudal's youth killed in an accident near North