शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

नृसिंहवाडीतील कृष्णेचे पाणी बनले हिरवट

By admin | Updated: October 16, 2015 00:37 IST

प्रदूषणाचा प्रश्न गंभीर : वेळीच उपाय योजण्याची भाविकांची मागणी

नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरासमोरील कृष्णा नदीपात्रात पाणी हिरवट झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रदूषणामुळे भाविक नाराज होत आहेत.महाराष्ट्रासह अनेक राज्यांत दत्तक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले नृसिंहवाडी या ठिकाणी अनेक भाविक दररोज मोठ्या संख्येने कृष्णा-पंचगंगा नदीत स्नान करतात. त्यानंतर श्री दत्त दर्शनासाठी जातात. यंदा पावसाने दडी मारल्याने दरवर्षीप्रमाणे येथील कृष्णा-पंचगंगा नद्या दुथडी भरून वाहिल्याच नाहीत. त्यामुळे पाणी साचून राहिल्याने या वर्षी आॅक्टोबर महिन्यापासूनच जलप्रदूषणाला सुरुवात झाली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून नदीचे पाणी अतिशय संथ गतीने पुढे जात आहे. नृसिंहवाडी गावातून येणारे पाणी थेट नदीत मिसळत आहे. शिवाय गुरुवारी सकाळपासून नदीतील पाणी हिरवट झाले आहे. पाण्याला जास्त प्रवाह नसल्याने ते पाणी दत्त मंदिर परिसरात साचून राहिले आहे. या पाण्याला एक प्रकारचा वास येत आहे. हे पाणी असेच साचून राहिले तर यात्रेकरू व ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी आॅगस्ट महिन्यात श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कन्यागत पर्वकाळ आहे. याबाबत पालकमंत्री, जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी यांच्या बैठका सुरू आहेत. कृष्णा-पंचगंगा नदीत थेट मिसळणाऱ्या सांडपाणी व जलप्रदूषणाबाबत योग्य ती उपाययोजना आतापासून सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.