ट्रॅक्टर अंगावर उलटून कोळींद्रेच्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST2021-05-23T04:24:24+5:302021-05-23T04:24:24+5:30

गडहिंग्लज : उतारावर उभी असलेली ट्रॅक्टर ट्राॅली अंगावर उलटल्यामुळे प्रदीप बाळकृष्ण पाटील (वय २१, रा. कोळींद्रे ता. आजरा) याचा ...

Kolindre's youth dies after tractor overturns | ट्रॅक्टर अंगावर उलटून कोळींद्रेच्या युवकाचा मृत्यू

ट्रॅक्टर अंगावर उलटून कोळींद्रेच्या युवकाचा मृत्यू

गडहिंग्लज : उतारावर उभी असलेली ट्रॅक्टर ट्राॅली अंगावर उलटल्यामुळे प्रदीप बाळकृष्ण पाटील (वय २१, रा. कोळींद्रे ता. आजरा) याचा जागीच मृत्यू झाला. चिंचेवाडी (ता. गडहिंग्लज ) येथे शनिवारी (२२) सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक भानुदास विष्णू पाटील यांच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, प्रदीप व भानुदास हे चिंचेवाडी गावात वनविभागाच्या तोडलेल्या लाकडांची ट्रॅक्टरने वाहतूक करत होते. शनिवारी सकाळी भानुदास याने रस्त्याच्या घसरण असणाऱ्या उतारावर ट्रॅक्टर उभा केला.

ट्रॅक्टर त्या ठिकाणी व्यवस्थित उभा राहील की नाही याकडे दुर्लक्ष केले.

दरम्यान, ट्रॅक्टरच्या कडेला प्रदीप उभा होता. अचानक ट्रॅक्टर ट्रॉलीसह प्रदीपच्या अंगावर उलटला. त्याखाली सापडल्यामुळे जागीच मृत्यू झाला. प्रदीपच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे.

विठ्ठल पाटील यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस हेड काॅन्स्टेबल संभाजी कोगेकर अधिक तपास करत आहेत.

कुटुंबीयांचा आक्रोश

बाळकृष्ण पाटील यांचा प्रदीप हा एकुलता एक मुलगा होता. १२ वी शिकत होता.

Web Title: Kolindre's youth dies after tractor overturns