शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकरांनी साकारले शाहू समाधी स्मारक, राजर्षी शाहू महाराजांची इच्छापूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 11:55 IST

कोल्हापूर : संपूर्ण देशाला सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक समतेचा संदेश देणाऱ्या; तसेच मागास वर्गाला जगातील पहिले आरक्षण आपल्या संस्थानात ...

ठळक मुद्देकोल्हापूरकरांनी साकारले शाहू समाधी स्मारक, राजर्षी शाहू महाराजांची इच्छापूर्तीराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती रविवारी लोकार्पण

कोल्हापूर : संपूर्ण देशाला सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक समतेचा संदेश देणाऱ्या; तसेच मागास वर्गाला जगातील पहिले आरक्षण आपल्या संस्थानात देणाऱ्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या इच्छेनुसार बांधण्यात आलेल्या त्यांच्या समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवारी (दि. १९) माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.कोल्हापूर महापालिकेने कोल्हापूरकरांच्या सहकार्यातूून उभारलेले हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक समाजाला पे्ररणा देईल, अशा पद्धतीने येथील नर्सरी बागेत उभारले आहे.

करवीरनगरीने हा लोकार्पण सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्धार केला असून, सलग चार दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. लोकार्पण सोहळ्यास श्रीमंत शाहू छत्रपती, मंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर उपस्थित राहणार आहेत.मृत्यूनंतर आपले समाधी स्मारक नर्सरी बागेत बांधले जावे, असे इच्छापत्र खुद्द शाहू महाराज यांनी लिहून ठेवले होते. कोल्हापुरातील काही शाहूप्रेमींनी याबाबत पुरावे दिले होते. त्यानुसार समाधी स्मारक उभारण्यात आले आहे.

शाहूंच्या सामाजिक विषमता दूर करण्याच्या ऐतिहासिक पर्वातील ‘हिरो’ ठरलेल्या कै. गंगाराम कांबळे यांच्या शाहू भक्त प्रसारक सोमवंश मंडळाने महाराजांचे छोटे समाधी स्मारक नर्सरी बागेत बांधले; परंतु काळाच्या ओघात ते नामशेष झाले. यानंतर शाहूप्रेमींच्या मागणीनंतर महापालिकेतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी या कामासाठी प्राधान्य देत स्वनिधीतून स्मारक उभारले.समाधी स्मारकाविषयी थोडक्यात

  •  एकूण खर्च - २ कोटी ८० लाख
  • चबुतरा व मेघंडबरी- एक कोटी रुपये
  •  संरक्षक भिंत- एक कोटी १० लाख
  • लॉन, विद्युत रोषणाई, दगडी फरशी- ७० लाख
  • कामाचे ठेकेदार- व्ही. के. पाटील
  •  आर्किटेक्चर- अभिजित जाधव, कसबेकर
  • मेघडंबरीचे शिल्पकार- किशोर पुरेकर

समाधी स्मारकाची वैशिष्ट्ये

  •  शेकडो वर्ष टिकेल असे समाधी स्मारक
  • स्मारकस्थळी बांधण्यात आलेल्या चौथऱ्याचे संपूर्ण काम काळ्या घडीव दगडात, अतिशय मजबूत.
  •  तीन टनांची ब्राँझची मेघडंबरी १६ फूट उंचीची असून, तिची लांबी-रुंदी सात फूट बाय सात फूट.
  •  छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचे आजोबा राजाराम महाराज यांची समाधी इटलीत बांधली असून, त्यावर उभारलेल्या मेघडंबरीची प्रतिकृती नर्सरी बागेतील समाधी स्मारकासाठी निवडण्यात आली.
  •  न्यू पॅलेस, जुना राजवाडा येथील खांबाचे नक्षीदार काम मेघडंबरीच्या खांबांवर कोरण्यात आले.

 

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीkolhapurकोल्हापूर