Kolhapur ZP Election Results 2026: राशिवडेत काँग्रेसला लागली लॉटरी, चुरशीच्या लढतीत सागर धुंदरे, अमृता पाटील विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 15:51 IST2026-02-09T15:50:38+5:302026-02-09T15:51:12+5:30

धामोड पंचायत समितीवर शिवसेनेचे केरबा पाटील तर राशिवडे पंचायत समितीवर कॉंग्रेसच्या अमृता पाटील 

Kolhapur ZP Election Results 2026 Congress wins lottery in Rashivade, Sagar Dhundare wins in tight contest in ZP constituency | Kolhapur ZP Election Results 2026: राशिवडेत काँग्रेसला लागली लॉटरी, चुरशीच्या लढतीत सागर धुंदरे, अमृता पाटील विजयी

Kolhapur ZP Election Results 2026: राशिवडेत काँग्रेसला लागली लॉटरी, चुरशीच्या लढतीत सागर धुंदरे, अमृता पाटील विजयी

अमर मगदूम 

राशिवडे : राशिवडे जिल्हा परिषद मतदार संघामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रीय काँग्रेसचे सागर धुंदरे विजयी झाले. धामोड पंचायत समितीत शिवसेनेचे केरबा पाटील तर राशिवडे पंचायत समितीत राष्ट्रीय काँग्रेसच्या अमृता पाटील विजयी झाल्या. निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

राशिवडे जिल्हा परिषदेसाठी झालेल्या २६९८९ मतांमध्ये भारतीय जनता पक्षाचे रविंद्र कानकेकर यांना ९०३ मते, काँग्रेसचे सागर धुंदरे यांना १०५४६ मते, शिवसेनेचे अशोक पाटील  ७५०५ मते. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) विनय पाटील यांना ७९०४ मते मिळाली. नोटास १२७ यामध्ये कॉंग्रेसचे सागर धुंदरे हे २६४२ मतांनी विजयी झाले.

धामोड पंचायत समितीसाठी झालेल्या १२२४४ मतांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयसिंग खामकर यांना ३४०६ मते मिळाली, भारतीय जनता पक्षाचे दिपसिंह नवने १०८७ शिवसेनेचे केरबा पाटील ३७६५ रविंद्र पाटील २२६१ राष्ट्रीय कॉंग्रेसचे विलास हळदे यांना २६१०मते मिळाली  तर नोटास ११४ मते झाली. शिवसेनेचे केरबा पाटील ३४० मतांनी विजयी झाले.

राशिवडे पंचायत समितीसाठी १३७४५ मतांमध्ये राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अमृता पाटील यांना ६५००मते मिळाली, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली संतोष पाटील यांना १७२६ मते मिळाली, शिवसेनेच्या सारीका सुभाष पाटील यांना ४९२८मते मिळाली, भारतीय जनता पक्षाच्या साक्षी सुरेश पाटील ५४० मते मिळाली तर नोटास ५१ मते झाली. राशिवडे पंचायत समितीत कॉंग्रेसच्या अमृता पाटील १५७२ मतांनी विजयी झाल्या.

कॉंग्रेसला लॉटरी

विजयी सागर धुंदरे व अमृता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. मात्र शेवटच्या क्षणी त्यांना डावलण्यात आले होते. त्यानंतर राधानगरीतील ए. वाय. पाटील यांनी काँग्रेसचे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत चुरस निर्माण केली होती. त्यामध्ये राशिवडे जिल्हा परिषद व पंचायत समितीत कॉंग्रेस विजयी झाली. या दोन विजयी उमेदवारांमुळे कॉंग्रेसला लॉटरी लागली.

Web Title : कोल्हापुर ZP चुनाव: राशिवडे में कांग्रेस जीती, धुंदरे और पाटिल विजयी

Web Summary : राशिवडे ZP में, कांग्रेस के सागर धुंदरे जीते। पंचायत समिति चुनावों में केरबा पाटिल (शिवसेना) और अमृता पाटिल (कांग्रेस) विजयी हुए। आतिशबाजी और रंगों के साथ जश्न मनाया गया।

Web Title : Kolhapur ZP Election: Congress Wins Rashivade, Dhundare and Patil Triumph

Web Summary : In Rashivade ZP, Congress's Sagar Dhundare won. Kerba Patil (Shiv Sena) and Amruta Patil (Congress) triumphed in the Panchayat Samiti elections. Celebrations erupted with fireworks and colors.