शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषद मतदारसंघ सोमवारी होणार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 17:44 IST

आजऱ्यातील रद्द मतदारसंघाचा प्रश्न न्यायालयात जाण्याची शक्यता

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदारसंघाची म्हणजेच गट आणि गणाची प्रारूप रचना सोमवारी जाहीर होणार आहे. करवीर आणि कागल तालुक्यात एक जिल्हा परिषद सदस्य आणि प्रत्येकी दोन सदस्य वाढणार असून आजरा तालुक्यातील एक जिल्हा परिषद जागा कमी होणार आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर चाचपणी करूनही यश न आल्याने आजरा मतदारसंघ रद्दविरोधात आज गुरुवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रातील गट आणि गणांची रचना करताना प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी ५० जिल्हा परिषद सदस्य आणि जास्तीत जास्त ७५ सदस्य रचना करण्यात येणार आहे. त्यानुसार ग्रामविकास विभागाने प्रारूपही तयार केले आहे. याआधी राज्य निवडणूक आयोगाकडून ही कार्यवाही होत होती; परंतु २०२२ मध्ये झालेल्या नियमातील बदलामुळे ही सदस्य संख्या देखील ग्रामविकास विभागाकडून निश्चित करण्यात आली आहे.

त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात ६८ गट आणि १३६ गण निश्चित करण्यात आले आहेत. यात आजरा तालुक्यातील एक गट कमी झाला असून तो आणि जादा वाढलेला एक असे दोन गट अनुक्रमे कागल आणि करवीरमध्ये वाढले आहेत. यासाठी सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला अहिल्यानगर जिल्हा आणि सर्वांत कमी लोकसंख्या असलेला सिंधुदुर्ग ग्रामीण लोकसंख्या असे सूत्र निश्चित करण्यात आले. त्यानुसार ‘फॅक्टर’ हा एक आकडा निश्चित करण्यात आला.

जिल्ह्याचे सूत्र असे ठरलेकोल्हापूर जिल्ह्याची २७ लाख ५३ हजार ९९५ लोकसंख्येतून सिंधुदुर्ग जिल्ह्याची ७ लाख ३८ हजार ४४७ लोकसंख्या वजा करण्यात आली. उर्वरित २० लाख १५ हजार ५४८ लोकसंख्येला फॅक्टर ठरलेल्या १ लाख १४ हजार ६४९ या संख्येने भागल्यानंतर १७.१८ हा आकडा येतो. हाच आकडा १८ असा धरण्यात आला. किमान जिल्हा परिषद सदस्य संख्या ५० अधिक १८ अशी कोल्हापूर जिल्ह्याची ६८ ही सदस्य संख्या निश्चित करण्यात आली.

तालुक्याचे सूत्र असे ठरलेप्रत्येक तालुक्याची लोकसंख्या भागिले जिल्ह्याची लोकसंख्या गुणिले ६८ असे सूत्र काढल्यानंतर जी संख्या येते तेवढी सदस्यसंख्या असे सूत्र ठरले. यामध्ये आजरा तालुक्याचा हा आकडा २.५४ इतका आला आहे; परंतु अन्य तालुक्यांचा हा आकडा वाढत गेल्याने सर्वांत कमी आकडा असलेल्या आजरा तालुक्याच्या वाट्याला केवळ दोनच सदस्य आले. तर प्रत्येक तालुक्याला किमान दोन सदस्य देणे बंधनकारक असल्याने गगनबावड्याची लोकसंख्या आजऱ्यापेक्षा कमी असूनही या तालुक्याला दोन सदस्य संख्या ठेवण्यात आली आहे.

१८ ऑगस्टला शिक्कामोर्तबसोमवार दि. १४ जुलै रोजी प्रारूप मतदारसंघ जाहीर झाल्यानंतर त्यावर २१ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती घेता येणार आहेत. यावरचा अभिप्राय २८ जुलैला जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांकडे सादर करतील. त्यानुसार विभागीय आयुक्त सुनावणी घेऊन हा प्रस्ताव पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे येईल आणि १८ ऑगस्टला जिल्हाधिकारी हा प्रारूप रचना प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहेत.