कोल्हापूर : तरुणास मारहाण, तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 13:50 IST2018-04-28T13:50:33+5:302018-04-28T13:50:33+5:30

शिवाजी उद्यमनगर येथील एका दूचाकी शोरुमच्या समोर परप्रांतीय तरुणास तिघा अज्ञात तरुणांनी बेदम मारहाण केली.

Kolhapur: The youth is beaten up, crime against three | कोल्हापूर : तरुणास मारहाण, तिघांवर गुन्हा

कोल्हापूर : तरुणास मारहाण, तिघांवर गुन्हा

ठळक मुद्देतरुणास मारहाण, तिघांवर गुन्हाराजारामपूरी पोलीस ठाण्यात फिर्याद

कोल्हापूर : शिवाजी उद्यमनगर येथील एका दूचाकी शोरुमच्या समोर परप्रांतीय तरुणास तिघा अज्ञात तरुणांनी बेदम मारहाण केली.

मानाराम बेमाराम जाखड (वय १९, मुळ रा. राजस्थान, सध्या जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. त्याचेवर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही घटना २६ एप्रिलला रात्री घडली. याप्रकरणी जाखड याने शुक्रवारी (दि. २७) राजारामपूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

अधिक माहिती अशी, मानाराम जाखड हा २६ एप्रिलच्या रात्री कामावरुन मित्रांसोबत घरी जात असताना त्याचे पाठिमागून तीन अज्ञात तरुण आले. त्यांनी जाखडला तुझे गाव कोणते, अशी विचारणा केली. त्याने काहीच उत्तर न दिल्याने तिघांनी शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली.

लोखंडी सळी हातावर मारल्याने गंभीर दूखापत झाली. यावेळी सोडविण्यास गेलेल्या त्याच्या मित्रांनाही मारहाण करण्यात आली. ‘त्या’ अज्ञात तिघांचा राजारामपूरी पोलीस शोध घेत आहेत.
 

 

Web Title: Kolhapur: The youth is beaten up, crime against three