शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

कोल्हापूर :‘व्हीव्हीपॅट’द्वारे झाले १ लाख ६८ हजार अभिरूप मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 11:08 IST

कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या ‘व्हीव्हीपॅट’ मशीनच्या चाचणीसाठी केर्ली येथील शासकीय गोदाम येथे अभिरूप मतदान ...

ठळक मुद्दे‘व्हीव्हीपॅट’द्वारे झाले १ लाख ६८ हजार अभिरूप मतदान२०० कर्मचाऱ्यांनी बजावला हक्क : केर्ली शासकीय गोदाम येथे प्रक्रिया

कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या ‘व्हीव्हीपॅट’ मशीनच्या चाचणीसाठी केर्ली येथील शासकीय गोदाम येथे अभिरूप मतदान झाले. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत २०० कर्मचाऱ्यांनी हक्क बजावल्याने १ लाख ६८ हजार इतक्या मतदानाची नोंद झाली.जिल्ह्यातील १0 विधानसभा मतदारसंघांसाठी ईव्हीएमची ७३२१ बॅलेट्स व ४२५७ कंट्रोल युनिट्स व ४२५७ व्हीव्हीपॅट मशीन्स प्राप्त झाली आहेत. त्यांच्या प्राथमिक तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. प्रथमच ‘व्हीव्हीपॅट’ मशीन्सचा वापर निवडणुकीत होणार आहे; त्यामुळे या मशीनची चाचणी घेण्यासाठी अभिरूप मतदान घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होेते.त्यानुसार सकाळी ९ वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन गिरी यांच्यासह कॉँग्रेस, भाजप, ताराराणी आघाडी, हिंदु महासभा, आदी पक्षांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.गोदामात तीन ठिकाणी मांडण्यात आलेल्या टेबलवर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे संच ठेवण्यात आले होते. करवीर, कागल येथील कर्मचाऱ्यांवर ८० मशीनची, गगनबावडा, चंदगड, भुदरगड, आजरा येथील कर्मचाऱ्यांवर ८० व पन्हाळा, राधानगरी, हातकणंगले, शिरोळ येथील कर्मचाऱ्यांवर ४० मशीनची जबाबदारी होती.

ईव्हीएम मशीनवरील चिन्हापुढे बोट दाबल्यानंतर झालेल्या मतदानाप्रमाणे व्हीव्हीपॅट मशीनमध्ये चिन्हांची चिठ्ठी येत होती व काही क्षणात ती बॉक्समध्ये पडत होती. इव्हीएमवर दाबलेल्या चिन्हाप्रमाणे व्हीव्हीपॅटवरील चिठ्ठीत चिन्ह आहे का नाही? याची खातरजमा कर्मचाऱ्यांकडून केली जात होती.

पहिल्या ८० मशीनवर ८०००० मतदान झाले. या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्यांने १००० वेळा हक्क बजावला. दुसऱ्या ८० मशीनवर ४०००० मतदान होऊन येथे प्रत्येक कर्मचाऱ्याने ५०० वेळा, तर तिसऱ्या ४० मशीनवर ४८००० मतदान होऊन, प्रत्येक कर्मचाऱ्याने १२०० वेळा बटन दाबले.

‘बेल’ कंपनीच्या अभियंत्यांच्या नियंत्रणाखाली ही प्रक्रिया सुरू होती. सायंकाळी व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्या मोजून झालेल्या मतदानाची शहानिशा करण्यात आली. दरम्यान, दुपारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी या ठिकाणी भेट देऊन प्रक्रियेची पाहणी केली.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही मतदानाचा हक्क बजावण्याची संधी देण्यात आली. मतदान झाल्यानंतर काही प्रतिनिधींनी आम्ही कोणाला मतदान केले आहे, हे कळण्यासाठी चिठ्ठी हवी असल्याचे सांगितले. यावर अधिकाऱ्यांनी तसे निर्देश नसल्याचे सांगितल्यावर. आमच्या सूचना आयोगाकडे कळवाव्यात, असे प्रतिनिधींनी सांगितले.

थर्मल पेपरची चिठ्ठी दहा वर्षे टिकणारव्हीव्हीपॅट मशीनमध्ये झालेल्या मतदानासाठी असणारी चिठ्ठी ही थर्मल पेपरची असून, त्यावरील शाई इतर चिठ्ठ्यांप्रमाणे उडू शकते, अशी शंका विचारल्यावर बेल कंपनीच्या अधिकाऱ्यानी किमान १0 वर्षे टिकेल, असा हा कागद व शाई असल्याचे सांगितले.

 

 

टॅग्स :VVPATव्हीव्हीपीएटीkolhapurकोल्हापूर