‘हज’ला गेलेले कोल्हापुरातील भाजीपाला व्यापारी जमीर बागवान यांचे 'मक्के'त निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:09 IST2025-06-24T16:07:44+5:302025-06-24T16:09:33+5:30

सौदी येथील ‘शराया’ या दफनभूमीत अंत्यविधी करण्यात आला

Kolhapur vegetable trader Jameer Bagwan who went for Hajj dies in Mecca | ‘हज’ला गेलेले कोल्हापुरातील भाजीपाला व्यापारी जमीर बागवान यांचे 'मक्के'त निधन

‘हज’ला गेलेले कोल्हापुरातील भाजीपाला व्यापारी जमीर बागवान यांचे 'मक्के'त निधन

कोल्हापूर : मुस्लीम बोर्डिंगचे माजी संचालक, महालक्ष्मी भाजीपाला व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जमीर महमंद बागवान (वय ५५) यांचे सोमवारी मध्यरात्री सव्वा एक वाजता ‘मक्का’ या ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते १९ मे रोजी हज यात्रेला कोल्हापुरातून गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी बहुतांशी विधी पूर्ण केले होते, यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात पवित्र ‘मक्का’ या ठिकाणी त्यांचे निधन झाले.

बागवान यांनी १२ जूनपर्यंत मक्का मधील विधी पूर्ण केले. पुढच्या विधीसाठी ते जाण्यापूर्वी १३ जूनपासून त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना सौदी येथील ‘अजजिया’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर ॲन्जोप्लास्टी केल्यानंतर १६ जूनला त्यांना डिस्चार्ज दिला, पण त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांना न्यूमोनिया झाल्याने उपचार सुरू असतानाच सोमवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर सौदी येथील ‘शराया’ या दफनभूमीत अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा मोठा परिवार आहे.

Web Title: Kolhapur vegetable trader Jameer Bagwan who went for Hajj dies in Mecca