कोल्हापूर : प्रयाग चिखलीत दोन गटात हाणामारी, दोघे जखमी : परस्पर विरोधी गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 17:34 IST2018-02-23T17:30:38+5:302018-02-23T17:34:07+5:30
प्रयाग चिखली (ता. करवीर) येथे अनैतिक संबध असलेल्या कारणातून दोन कुटूंबात जोरदार हाणामारी झाली. चाकु व काठीचा वापर केल्याने दोन्ही बाजूचे दोघे जखमी झाले. सर्जेराव बळवंत कळके (वय ४८), पांडुरंग अशोक कळके (२७) अशी जखमींची नावे आहेत. ही हाणामारी बुधवार (दि. २१) रोजी रात्री घडली. याप्रकरणी गुरुवारी करवीर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले.

कोल्हापूर : प्रयाग चिखलीत दोन गटात हाणामारी, दोघे जखमी : परस्पर विरोधी गुन्हे दाखल
कोल्हापूर : प्रयाग चिखली (ता. करवीर) येथे अनैतिक संबध असलेल्या कारणातून दोन कुटूंबात जोरदार हाणामारी झाली. चाकु व काठीचा वापर केल्याने दोन्ही बाजूचे दोघे जखमी झाले. सर्जेराव बळवंत कळके (वय ४८), पांडुरंग अशोक कळके (२७) अशी जखमींची नावे आहेत. ही हाणामारी बुधवार (दि. २१) रोजी रात्री घडली. याप्रकरणी गुरुवारी करवीर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले.
अधिक माहिती अशी, सुरेश बळवंत कळके व पांडूरंग अशोक कळके या दोन्ही कुटूंबात गेल्या दोन वर्षापासून वाद सुरु आहे. पांडूरंग कळके याचे नात्यातील महिलेशी अनैतिक संबध असलेचे संशयातून या दोन्ही कुटूंबात बुधवारी जोरदार हाणामारी झाली.
दोन्ही बाजूंनी चाकु व काठीचा वापर केला. पांडूरंग कळके याने घरात घुसून सर्जेराव कळके यांना चाकुने भोकसले. यावेळी झटापटीमध्ये पांडूरंगही जखमी झाला. या दोघांनी परस्पर विरोधी करवीर पोलीसांत फिर्याद दिली.
सुरेश् कळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित पांडूरंग अशोक कळके, अरविंद शंकर करपे व पांडूरंग कळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सर्जेराव बळवंत कळके, रोहित सुरेश कळके, विशाल सुरेश कळके, कुशाल अशोक कळके आदींच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.