हरियाणात सेक्स रॅकेट उधळलं, महिलांसह 5 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 04:46 PM2018-02-23T16:46:08+5:302018-02-23T16:54:16+5:30

हरियाणातल्या पलवलमधल्या प्रकाश विहार येथे सुरू असलेलं सेक्स रॅकेट पोलिसांनी उधळलं आहे. सेक्स रॅकेट चालवणा-या 3 महिला आणि दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली.

Sex racket erupted in Haryana; 5 people including women arrested | हरियाणात सेक्स रॅकेट उधळलं, महिलांसह 5 जणांना अटक

हरियाणात सेक्स रॅकेट उधळलं, महिलांसह 5 जणांना अटक

googlenewsNext

पलवल- हरियाणातल्या पलवलमधल्या प्रकाश विहार येथे सुरू असलेलं सेक्स रॅकेट पोलिसांनी उधळलं आहे. सेक्स रॅकेट चालवणा-या 3 महिला आणि दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली. पलवल पोलीस स्टेशनच्या ठाणेदार कमला देवी यांनी सांगितलं की, प्रकाश विहारमधल्या एका व्यक्तीनं सेक्स रॅकेट सुरू असल्याची पोलिसांना सूचना दिली. त्या व्यक्तीच्या बाजूलाच राहणाऱ्या रणबीर नावाच्या दुस-या व्यक्तीच्या दुकानामध्येच हे सेक्स रॅकेट सुरू होतं.

सूचना मिळताच पोलिसांनी छापा टाकला. छाप्यादरम्यान पोलिसांना रणबीरच्या दुकानात 3 महिला आणि दोन तरुण अश्लील अवस्थेत दिसले, त्यावेळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे त्यातील दोन महिला विवाहित आहेत, तर एक अविवाहित आहे. अटक करण्यात आलेल्या दोन तरुणांची ओळखही पटली असून, नरेश आणि राकेश यांना अटक करण्यात आली आहे. या पाच आरोपींविरुद्ध देहव्यापार करण्यात खटला दाखल करण्यात आला आहे. तर छाप्यादरम्यान दुकानाचा मालक पोलिसांना चकमा देऊन फरार झाला आहे. 

तर गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये एक ढोंगीबाबा आश्रमातच सेक्स रॅकेट चालवत असताना पोलिसांनी त्याचा पर्दाफाश केला होता. मध्य प्रदेशमधील उज्जैन जिल्ह्यात पोलिसांनी हे सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केले असून, या रॅकेटचा म्होरक्या एक पुजारी असल्याचे समोर आले होते. तंत्रामंत्राच्या आडून बाहेरून मुली आणि महिलांना आणून हे सेक्स रॅकेट चालवले जात होते. मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान या रॅकेटचा म्होरक्या असलेला पुजारी फरार झाला होता. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राघवी पोलीस ठाणे क्षेत्रातील बालेरा गावात एक ढोंगीबाबा आपल्या आश्रमामध्ये अनैतिक कृत्ये करत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राघवी ठाण्याचे टीआय दिनेश भोजक आपल्या पथकासह या या आश्रमाच्या ठिकाणी गेले. तेथे एक कॉलगर्ल दोन व्यक्तींसह आक्षेपार्ह स्थितीत सापडली. या तिघांनाही अटक करण्यात आली. मात्र गोंधळाचा फायदा घेऊन बोगस बाबा रामदास तिथून पसार झाला होता. हा बाबा आपल्याकडे तंत्रसिद्धी असल्याचा दावा करत असे. मात्र त्याच्या आडून तो असे काही धंदे चालवत असेल याची कल्पना गाववासियांना नव्हती. दरम्यान, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता

Web Title: Sex racket erupted in Haryana; 5 people including women arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.