शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

कोल्हापूर : घोरपडे कारखान्यावर कारवाई करू, प्रदूषण मंडळाची शिवसेना शिष्टमंडळाला ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:50 AM

कागल तालुक्यातील संताजी घोरपडे साखर कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाची जाग्यावर जाऊन पाहणी केली आहे. जल प्रदूषण कायद्यांतर्गत कारखान्यावर उचित कारवाई करू, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी नागेश लोहळकर यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली.

ठळक मुद्देघोरपडे कारखान्यावर कारवाई करूप्रदूषण मंडळाची शिवसेना शिष्टमंडळाला ग्वाही

कोल्हापूर : कागल तालुक्यातील संताजी घोरपडे साखर कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाची जाग्यावर जाऊन पाहणी केली आहे. जल प्रदूषण कायद्यांतर्गत कारखान्यावर उचित कारवाई करू, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी नागेश लोहळकर यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली.कारखान्याचे दूषित पाणी नदीत मिसळत असल्याबद्दल सोमवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रदूषण नियंत्रण कार्यालयास भेट देऊन कारखान्यावर कारवाईची मागणी केली. यावेळी संभाजी भोकरे, अविनाश शिंदे, अशोक पाटील, शिवगोंडा पाटील, चंद्रकांत भोसले, आदी उपस्थित होते.

नोकरी धोक्यात घालतो; पण .....शिष्टमंडळाने प्रश्नांचा भडिमार केल्यानंतर, मीही सामान्य माणूस आहे, मलाही वेदना होतात. नोकरी धोक्यात घालून कारखाना बंद करण्याची कारवाई करतो. आधी कारवाई करतो, मग वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवितो, असे लोहळकर यांनी सांगितले.

लोहळकरांचे ‘धन्यवाद आणि जयहिंद’लोहळकर यांनी पहिल्यांदा कारखाना बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पंधरा मिनिटांत घूमजाव केल्याने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे गोंधळून गेलेल्या लोहळकर यांनी प्रतिनिधींना ‘धन्यवाद, जयहिंद’ म्हणत हात जोडले.

टॅग्स :pollutionप्रदूषणkolhapurकोल्हापूर