शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

कोल्हापूर : हृदयविकार, मधुमेह, कर्करोग निदानासाठी विशेष शिबिरे, राज्यातील उर्वरित १७ जिल्ह्यांसाठी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:31 IST

समीर देशपांडेकोल्हापूर : हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे यासाठी आता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तीस वर्षांवरील नागरिकांसाठी वर्षांतून दोन शिबिरे घेण्यात येणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानां तर्गत सध्या राज्यातील १७ जिल्ह्यांत ही योजना राबविली जात असून, आता उर्वरित १७ जिल्ह्यांतही ही योजना राबविण्यात येणार आहे.याआधी प्राथमिक आरोग्य ...

ठळक मुद्दे राज्यातील उर्वरित १७ जिल्ह्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत योजनाऔरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूरचा समावेशउर्वरित जिल्ह्यांत सुरू होणार योजना

समीर देशपांडे

कोल्हापूर : हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे यासाठी आता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तीस वर्षांवरील नागरिकांसाठी वर्षांतून दोन शिबिरे घेण्यात येणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सध्या राज्यातील १७ जिल्ह्यांत ही योजना राबविली जात असून, आता उर्वरित १७ जिल्ह्यांतही ही योजना राबविण्यात येणार आहे.याआधी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर अशी शिबिरे घेण्यासाठी आर्थिक तरतुदीचा मुद्दा पुढे येत असे. मग जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून किंवा जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी उपलब्ध झाल्यासच अशी शिबिरे घेता येत असत. मात्र, याला खूप मर्यादा पडत होत्या. मात्र, आता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गतच या योजनेचा समावेश करण्यात आल्याने त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे.या तीनही आजारांचे निदान करणारे तज्ज्ञ डॉक्टर यासाठी नियुक्त करण्यात येणार असून, त्यांच्याकडूनच या शिबिरांमध्ये तपासणी केली जाणार आहे. या शिबिरांमध्ये जर काही या आजारांची लक्षणे असलेले नागरिक आढळले, तर त्यांना पुढील तपासणीसाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय असंसर्गीय रुग्ण कक्षाकडे पाठविण्यात येणार आहे. गरज पडल्यास पुढच्या उपचाराचीही सोय शासनामार्फत केली जाणार आहे. यासाठी आवश्यक ते डॉक्टर्स आणि अन्य मनुष्यबळ भरण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.प्रत्येक जिल्ह्यासाठी १७ लाख ५१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यातून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. १७ जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया आता सुरू झाली असून मार्च २0१८ अखेर ही दोन शिबीरे घेण्यात येणार आहेत.

उर्वरित या जिल्ह्यांत सुरू होणार ही योजनारायगड, पालघर, धुळे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, बीड, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया

ही योजना कशासाठी?वयाच्या तिशीनंतर हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगाची लक्षणे दिसत असल्याचे चित्र विविध सर्वेक्षणांमधून पुढे आले आहे. बदललेली जीवनशैली, धूम्रपान, वाढत्या खतांचा वापर अशा अनेक कारणांमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. मात्र, ग्रामीण भागात आर्थिक कारणासह दुर्लक्षामुळे याबाबत लवकर निदान होत नाही व शेवटच्या टप्प्यात हे रोग झाल्याचे निष्पन्न होते. वेळीच निदान व्हावे आणि पुढे उपचार व्हावेत यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHealthआरोग्यGovernmentसरकार