शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
11
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
12
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
13
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
14
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
15
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
16
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
17
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
18
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
20
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 

कोल्हापूर : मिरवणुकीत साउंड सिस्टीम चालणार नाही : प्रशांत अमृतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:55 PM

सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत साउंड सिस्टीम चालणार नाही. कोणी तसा उपद्व्याप करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित मंडळाची सिस्टीम जाग्यावर जप्त करून गुन्हा दाखल केला जाईल, अशा कडक सूचना शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी शिवाजी पेठ, मंगळवार पेठ परिसरातील २५ ते ३० मंडळांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना दिल्या.

ठळक मुद्देमिरवणुकीत साउंड सिस्टीम चालणार नाही : प्रशांत अमृतकरशिवाजी मंदिरात मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

कोल्हापूर : सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत साउंड सिस्टीम चालणार नाही. कोणी तसा उपद्व्याप करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित मंडळाची सिस्टीम जाग्यावर जप्त करून गुन्हा दाखल केला जाईल, अशा कडक सूचना शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी शिवाजी पेठ, मंगळवार पेठ परिसरातील २५ ते ३० मंडळांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना दिल्या.सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन रात्रंदिवस मेहनत घेत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मंडळांच्या बैठका घेऊन साउंड सिस्टीममुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. काही मंडळांनी साउंड सिस्टीमचा वापर करणार नाही, असे लेखी दिले आहे.

दरवर्षी ऐन मिरवणुकीत शिवाजी पेठ, मंगळवार पेठेतील काही उपद्व्यापी मंडळे साउंड सिस्टीमचा वापर करतात. मिरवणुकीत घुसण्याचा प्रयत्न करतात. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये वादावादी होऊन मिरवणूक अनेक तास रेंगाळली जाते. अशा प्रकारची पुनरावृत्ती घडू नये, याची खबरदारी म्हणून शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी बुधवारी सायंकाळी सहा वाजता शिवाजी मंदिरात प्रमुख २५ ते ३० मंडळांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर डॉ. अमृतकर यांनी मिरवणुकीत साउंड सिस्टीम चालणार नाही. पारंपरिक वाद्यांचा वापर करा, मिरवणुकीचा आनंद घ्या. कोणी साउंड सिस्टीमचा आग्रह धरून पोलिसांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. साउंड सिस्टीम घेऊन येणाऱ्यांना मिरवणुकीत प्रवेश तर दिला जाणार नाहीच; त्याचबरोबर सिस्टीम जागेवर जप्त करून गुन्हा दाखल केला जाणार आहे.

साउंड सिस्टीमला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. तूर्तास या सिस्टीमला उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही. ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडणाऱ्या साउंड सिस्टीमला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणे शक्य नाही, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. त्यामुळे मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करा, पोलिसांना सहकार्य करा, अशा सूचना दिल्या. बैठकीस दयावान, अवचित, हिंदवी, बालगोपाल, खंडोबा, बी.जी.एम., आदींसह तालीम मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८kolhapurकोल्हापूर