शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

Kolhapur: नरेंद्र मोदींकडून सामाजिक सदभाव उद्ध्वस्त, पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

By समीर देशपांडे | Updated: May 26, 2023 19:01 IST

Kolhapur: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून त्यांना आम्ही नऊ प्रश्न विचारत आहोत. हिंमत असेल तर त्यांनी त्याची उत्तरे द्यावीत

- समीर देशपांडेकोल्हापूर -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून त्यांना आम्ही नऊ प्रश्न विचारत आहोत. हिंमत असेल तर त्यांनी त्याची उत्तरे द्यावीत. मोदी यांनी देशातील सामाजिक सदभाव उध्वस्त केला असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केला. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री सतेज पाटील उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, या नऊ वर्षात अर्थव्यवस्था उध्वस्त झाली. महागाई, बेरोजगारी वाढली. भरमसाठी कर आकारणी करूनही देशावरील कर्ज वाढतच निघाले आहे. हे देखील पैसे पुरेनात म्हणून सरकारी कंपन्याही विकायला काढण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही आणि आत्महत्याही थांबल्या नाहीत. अदानीसारख्या कंत्राटदारांना पाठबळ दिले गेले. चीनने आक्रमण केल्यानंतरही त्यांना क्लीनचीट दिली गेली. पंतप्रधान याबाबत काहीही बोलत नाहीत हे दुर्देवी आहे.

अल्पसंख्यांक, एस. टी. एन.टी.यांच्यावरील अत्याचार वाढले आहेत. जातनिहाय जनगणनेविषयी मोदी बोलत नाहीत. सर्व तपास यंत्रणा विरोधकांच्या मागे लावण्यात येत आहेत. त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक कल्याणाच्या योजनांमध्ये कपात केली जात आहे. काेरोनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना नुकसानभरपाईही मिळालेली नाही.

शिंदे, फडणवीस सामना करू शकत नाहीतज्या पध्दतीने राज्यात सत्तांतर झाले ते लोकांना आवडलेले नाही. त्यामुळे शिंदे फडणवीस हे महाविकास आघाडीशी सामना करू शकत नाहीत असा विश्वास चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.  देवेंद्र फडणवीस कर्नाटकचे जे विश्लेषण करत आहेत तसे नाही. बेंगलोर विभाग वगळता अन्य कुठल्याही भागात भाजपला जादा मतदान झालेले नाही.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर