शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

कोल्हापूर : शाहूपुरीत तीन पत्त्यांच्या जुगारअड्ड्यावर छापा; १३ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 7:30 PM

तीन पत्त्यांच्या जुगारअड्ड्यावर सोमवारी (दि. २३) रात्री शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून व्यवस्थापकासह १३ जणांना अटक केली. त्यांच्याकडून चार मोटारसायकल, १४ मोबाईल, दूरचित्रवाणी (टी.व्ही.), इलेक्ट्रीक शेगडी, फॅन, सतरंजी असा सुमारे चार लाख ३८ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्दे शाहूपुरीत तीन पत्त्यांच्या जुगारअड्ड्यावर छापा; १३ जणांना अटकचार लाख ३८ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : तीन पत्त्यांच्या जुगारअड्ड्यावर सोमवारी (दि. २३) रात्री शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून व्यवस्थापकासह १३ जणांना अटक केली. त्यांच्याकडून चार मोटारसायकल, १४ मोबाईल, दूरचित्रवाणी (टी.व्ही.), इलेक्ट्रीक शेगडी, फॅन, सतरंजी असा सुमारे चार लाख ३८ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.व्हीनस कॉर्नर ते विल्सन पूल रोडवरील तीन मजली इमारतीमध्ये हा जुगार चालला होता. या जागेचा मालक कच्छी (रा. जवाहरनगर, कोल्हापूर, पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) नावाची व्यक्ती असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, तीनमजली इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर हा पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार छापा टाकला. याप्रकरणी व्यवस्थापक संशयित संजय शंकर पाटील (वय ४८, रा. शाहूपुरी, पाचवी गल्ली), कृष्णा गणपती पाटील (४२, रा. कोतोली, ता. पन्हाळा), संजय अंतू सावंत (४०, रा. विक्रमनगर,जुन्या व्यायामशाळेजवळ), शाहीद शकील सय्यद (३२, रा. घिसाड गल्ली, सोमवार पेठ), नीलेश बाबूराव गवळी (४०, रा. शिंगणापूर), सुनील महादेव पाटील (३५), विजय आण्णासो थोरवत (३२, दोघे रा. हेर्ले, ता. हातकणंगले), जमीर बाबू महात (३२, रा. जवाहरनगर, कोल्हापूर), लोकदास शंकरन नायर (५०, रा. टाकाळा), युवराज नारायण कांबळे (४०, रा. वरणगे पाडळी, ता. करवीर), रंगराव बाळासो लोखंडे (४७, रुकडी, ता. हातकणंगले), महादेव सुनील जगताप (२२) व गोविंद अंकुश कांबळे (२१, दोघे रा. राजेंद्रनगर) यांना अटक करण्यात आली. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली आहे. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर