कोल्हापूर : ‘आरटीओ’च्या सेवांचे शुल्क आॅनलाईन : पुणेनंतर दुसरा पथदर्शी प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:53 IST2018-09-28T00:49:51+5:302018-09-28T00:53:39+5:30
कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) बहुतांश सेवांचे शुल्क वाहनधारकांना आता आॅनलाईन पद्धतीने भरता येणार आहे, अशा प्रकारे आॅनलाईन सेवा देणारे राज्यातील पुण्यानंतरचे कोल्हापूर हे दुसरे कार्यालय

कोल्हापूर : ‘आरटीओ’च्या सेवांचे शुल्क आॅनलाईन : पुणेनंतर दुसरा पथदर्शी प्रयोग
कोल्हापूर : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) बहुतांश सेवांचे शुल्क वाहनधारकांना आता आॅनलाईन पद्धतीने भरता येणार आहे, अशा प्रकारे आॅनलाईन सेवा देणारे राज्यातील पुण्यानंतरचे कोल्हापूर हे दुसरे कार्यालय ठरले आहे. या सेवेमुळे वाहनधारकांचा वेळ वाचणार आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने परिवहनेतर (खासगी) वाहनांच्या विविध सेवा; जसे वाहन नोंदणी, पुनर्नोंदणी, कर्जनोंदणी, कर्ज उतरविणे, कर्जसंलग्नता, मालकी हक्कांचे हस्तांतरण, पत्ताबदल, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, ना-हरकत प्रमाणपत्र, पर्यावरण कर, आदी स्वरूपांच्या कामांकरिताचे शुल्क, दंड, आदी वाहनधारकांना वाहन ४.० प्रणालीवर आॅनलाईन प्रकाराने अर्ज करून त्याचे आॅनलाईन शुल्क भरता येणार आहे.
या पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात माल, प्रवासी वाहतूक करणारी वाहने, त्यांचे तात्पुरते परवाने, तीन, सहा, वार्षिक, द्विवार्षिक व एकरकमी कर, पर्यावरण कर, वाहनातील बदल त्याचे शुल्क, वाहनांचे फिटनेस (नवीन वाहनांना दोन वर्षांनंतर) त्याची आॅनलाईन अपॉइंटमेंटहीवाहनधारकांना घेता येणार आहे, अशी सेवाही प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली असून, ती १ आॅक्टोबरपासून लागू केली जाणार आहे. त्यामुळे एकूणच वाहनधारकांचा वेळ वाचणार आहे. अशा प्रकारची सेवा देणारे हे राज्यातील दुसरे कार्यालय ठरले आहे.
आॅनलाईन सेवा देणारी केंद्रे उभारणार
केवळ प्रादेशिक परिवहन कार्यालयाला लागणाºया आॅनलाईन सेवा देण्याकरिता ३०० हून महा-ई सेवासारखी केंद्रेही संगणकांचे जुजबी ज्ञान असणाºया युवकांना जिल्ह्यात दिली जाणार आहेत.
असा पथदर्शी प्रयोग या कार्यालयांतर्गत कºहाड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या क्षेत्रात कºहाड, पाटण या तालुक्यांत सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी २१ केंद्रेही सुरू करण्यात आली आहेत.
सर्व सेवांचे शुल्क आॅनलाईन पद्धतीने सुरू केल्यानंतर वाहनधारकांना त्याचा लाभच होणार आहे.
यातून वेळ, दंड वाचणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.
मोठा महसूल
पसंतीच्या क्रमांकाच्या लिलावातून प्रत्येक वर्षी तीन ते चार कोटी रुपयांचा विशेष महसूल गोळा करणारे कार्यालय म्हणूनही राज्यभर या कार्यालयाची ख्याती आहे. आता येत्या काही दिवसांत हे कार्यालय वाहनांच्या क्रमांकाचे ई-आॅक्शन आॅनलाईन पद्धतीने करणार आहे. या संगणक प्रणालीचीही तयारी सुरू आहे.