शहरं
Join us  
Trending Stories
1
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
2
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
3
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
4
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
5
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
6
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
7
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
8
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
9
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
10
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
11
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
12
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
13
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
14
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
15
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
16
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
17
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
18
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
19
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
20
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर ते पुणे एसटीने वेग पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 18:16 IST

CoronaVirus St Kolhapur : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असताना एसटीनेही सेवा विस्तार वाढवण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर-पुणे मार्गावर सुरू झालेल्या एसटीने आता वेग पकडला आहे. बुधवारी कोल्हापूर डेपोच्या चार, शिवाजीनगर व स्वारगेटच्या प्रत्येकी दोन अशा आठ गाड्यांमधून कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातून साधारणपणे दोनशेंच्यावर प्रवाशांनी प्रवास केला.

ठळक मुद्देकोल्हापूर ते पुणे एसटीने वेग पकडला

कोल्हापूर : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असताना एसटीनेही सेवा विस्तार वाढवण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर-पुणे मार्गावर सुरू झालेल्या एसटीने आता वेग पकडला आहे. बुधवारी कोल्हापूर डेपोच्या चार, शिवाजीनगर व स्वारगेटच्या प्रत्येकी दोन अशा आठ गाड्यांमधून कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातून साधारणपणे दोनशेंच्यावर प्रवाशांनी प्रवास केला. दरम्यान, प्रवासी संख्या वाढेल तशा प्रमुख मार्गांवरील फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याचे एसटीच्या वाहतूक शाखेने सांगितले.कोरोनाचा संसर्ग वाढल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कडक केल्यापासून एसटीच्या फेऱ्या अत्यावश्यक सेवा वगळता बंदच होत्या. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने एसटी सेवा हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी चांगला प्रतिसाद मिळाल्याने बुधवारीदेखील एसटी पुणे मार्गावर सोडण्यात आल्या.

५० टक्के भारमानाच्या नियमाचे पालन करत एकेका एसटीमध्ये २० प्रवासी घेऊनच एसटी धावत आहे. सॅनिटायझर सुविधेसह मास्क बंधनकारक आहे. एक सीट आड अशी बैठक व्यवस्था ठेवण्यात आली आहे.अजूनही गाडी सुटण्याच्या वेळा निश्चित नाहीत, पण तास ते दीड तासाच्या अंतराने एक बस सुटेल असे नियोजन वाहतूक शाखेकडून केले जात आहे. एसटी नियमानुसार प्रवाशांची संख्या झाल्यावर सोडली जात आहे. प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत असलीतरी काही नसण्यापेक्षा काहीतरी आहे, असे समजून प्रवासी सहकार्य करताना दिसत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीkolhapurकोल्हापूरPuneपुणे