कोल्हापूर : प्रवाशाचा किंमती मोबाईल लंपास, तिघा लुटारुंवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 14:43 IST2018-05-07T14:43:13+5:302018-05-07T14:43:13+5:30

सासणे मैदान येथील एका सराफी दूकानासमोर थांबलेल्या रिक्षा चालकासह प्रवाशाला तिघा लुटारुंनी दमदाटी करुन किंमती मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. शनिवारी (दि. ५) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

Kolhapur: The price of passenger has been found in mobile lamps, crime against three gangsters | कोल्हापूर : प्रवाशाचा किंमती मोबाईल लंपास, तिघा लुटारुंवर गुन्हा

कोल्हापूर : प्रवाशाचा किंमती मोबाईल लंपास, तिघा लुटारुंवर गुन्हा

ठळक मुद्देप्रवाशाचा किंमती मोबाईल लंपासतिघा लुटारुंवर गुन्हा : सासने मैदानासमोरील घटना

कोल्हापूर : सासणे मैदान येथील एका सराफी दूकानासमोर थांबलेल्या रिक्षा चालकासह प्रवाशाला तिघा लुटारुंनी दमदाटी करुन किंमती मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. शनिवारी (दि. ५) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.


अधिक माहिती अशी, अनिल मनोहर शेलार (वय ५४, रा. ताराबाई पार्क) हे गोव्यातील एका वृत्तपत्रात नोकरी करतात. शनिवारी ते गोव्याहून कोल्हापूरला आले. मध्यवर्ती बसस्थानक येथे रिक्षा पकडून ते ताराबाई पार्क येथील घरी गेले.

काही तासांनी आपला मोबाईल हॅन्डसेट रिक्षामध्ये विसरलेचे शेलार यांचे लक्षात आले. त्यांनी रिक्षा चालक जुनेद आदम शेख (वय २५, रा. शिवाजी पेठ) यांना फोनवरुन चौकशी केली असता त्यांनी सासणे मैदान येथील सराफी दूकानाच्या समोर थांबलेचे सांगितले.

शेलार यांनी सासणे मैदान येथे येवून रिक्षा गाठली. यावेळी मोपेडवरुन आलेल्या तिघा अज्ञात तरुणांनी रिक्षाचालकासह शेलार यांना दमदाटी करुन शेलार यांचा मोबाईलसह रोकड असा पंधरा हजार किंमतीचा मुद्देमाल घेवून पोबारा केला.

शेलार यांनी याप्रकरणी शाहुपूरी पोलीसांत फिर्याद दिली. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन लुटारुंचा माग काढत आहेत.
 

 

Web Title: Kolhapur: The price of passenger has been found in mobile lamps, crime against three gangsters