शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

कोल्हापूर : पाणीटंचाई निवारणासाठी ३३ विंधन विहिरींचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 12:33 PM

कोल्हापूर जिल्हयातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करता पाणीटंचाई निवारण कृती आराखडा उपाययोजनांतर्गत विंधन विहिरींसाठी जिल्हयातून ३३ प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत. लवकरच हे मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे येणार आहेत. यावर शहानिशा होऊन प्रांताधिकाऱ्यांचा अभिप्राय घेतल्यानंतरच त्याला मंजुरी दिली जाणार आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई निवारणासाठी ३३ विंधन विहिरींचे प्रस्ताव जिल्हा परिषद लवकरच मान्यतेसाठी जिल्हा प्रशासनाला पाठविणार प्रांताधिकाऱ्यांच्या अभिप्रायानंतरच मिळणार मंजुरी

प्रवीण देसाई

कोल्हापूर : जिल्हयातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करता पाणीटंचाई निवारण कृती आराखडा उपाययोजनांतर्गत विंधन विहिरींसाठी जिल्हयातून ३३ प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत. लवकरच हे मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे येणार आहेत. यावर शहानिशा होऊन प्रांताधिकाऱ्यांचा अभिप्राय घेतल्यानंतरच त्याला मंजुरी दिली जाणार आहे.संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी आॅक्टोबर ते डिसेंबर महिन्याच्या कालावधीत पाणीटंचाई निवारण कृती आराखडा उपाययोजनेंतर्गत ग्रामस्तरावरून माहिती घेतली जाते. त्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक, जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक भूवैज्ञानिक, कार्यकारी अभियंता यांच्या माध्यमातून पाहणी करून तो प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला जातो.

ही पाहणी करताना संबंधित गावांत चौदाव्या वित्त आयोगातून पाणीपुरवठ्या संदर्भातील कोणते काम झाले आहे का हे पाहिले जाते. त्यानंतर त्या गावात पाण्यासाठी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे ते पाहिले जाते.

यामध्ये उदा. विंधन विहिरी, विहिरींचा गाळ काढणे व खोलीकरण, खासगी विहिरी अधिग्रहण करणे, नळ पाणीपुरवठा योजना विशेष दुरुस्ती करणे, टॅँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे आदींचा यामध्ये समावेश आहे.

यंदा संंबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून विंधन विहिरींसाठीचे ३३ प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केले आहेत. हे प्रस्ताव परिपूर्ण करून जिल्हा परिषदेने मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवायचे आहेत.

लवकरच ते येणे अपेक्षित आहे. हे प्रस्ताव प्राप्त झाल्यावर खरोखर संबंधित गावात पाणीटंचाई आहे का? तसेच त्या ठिकाणी कोणती उपाययोजना अपेक्षित असून ती निकषांत बसते का हे पाहिले जाणार आहे. त्याचबरोबर संंबंधित प्रांताधिकाऱ्यांकडून अभिप्राय घेऊनच जिल्हाधिकारी त्याला मंजुरी देणार आहेत.

तालुके               प्रस्तावहातकणंगले       ६भुदरगड             ४गडहिंग्लज         ४कागल               ६राधानगरी         ६गगनबावडा      २चंदगड              २आजरा             १करवीर             २

जिल्हाधिकारीच घेणार निर्णयपाणीटंचाईसंदर्भात जिल्हा परिषदेकडे विंधन विहिरींसाठी प्राप्त झालेले प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे येणार आहेत. त्यावर शहानिशा करून आवश्यकता असल्यास या प्रस्तावांना मंजुरी जिल्हाधिकारी देणार आहेत. त्याचे सर्वाधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीcollectorतहसीलदारzpजिल्हा परिषद