शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महानगरपालिकेचे मुख्यालय होणार शेंडापार्कात; पाच एकर जागा हस्तांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:48 IST

अजित पवार यांनी दिले होते ८० कोटींचे आश्वासन

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसाठी शेंडा पार्क येथील दोन हेक्टर (पाच एकर) जागा हस्तांतरित करण्यात आली. त्यामुळे नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यातील अडचणी आता दूर झाल्या आहेत.भावसिंगजी रोडवर महानगरपालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत असून, या संस्थानकालीन इमारतीतून महापालिकेचा स्थापनेपासून कारभार चालवला जात आहे. ही इमारत अपुरी पडू लागल्यामुळे नव्या प्रशासकीय इमारतीसाठी जागेची मागणी करण्यात येत होती.याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शेंडापार्क इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गट नंबर ६०२/२ मधील दोन हेक्टर जागा प्रशासकीय इमारतीसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिल होते. ६ फेब्रुवारीला आदेश दिल्यानंतर जमिनीच्या सातबारा पत्रकात इतर हक्कांमध्ये महानगरपालिकेच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.पाच एकरांच्या विस्तीर्ण परिसरामध्ये महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत, पार्किंग, नागरी सुविधा केंद्र, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची दालने, तसेच सभागृह उभारण्यात येणार असून लवकरच यासंबंधीची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

अजित पवार यांनी दिले होते ८० कोटींचे आश्वासनउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी पहिल्या टप्प्यात ८० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. यासंदर्भात अपघात होण्याच्या आदले दिवशी म्हणजेच दि. २७ जानेवारीला अजित पवार आणि आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांचे फोनवर बोलणे झाले होते. प्रशासकीय इमारतीला दोन एकर जागा द्यावी, असा अभिप्राय होता; परंतु पवार यांनीच दोनची पाच एकर करा, असे आदेश दिले. कोणाचे घर बांधत नाहीत, प्रशासकीय इमारत बांधायची आहे, असेही त्यांनी बजावले होते. पवार यांच्यामुळे दोनची पाच एकर जागा देण्यात आली; परंतु निधी देण्याआधीच त्यांचे विमान अपघातात निधन झाले.

शेंडापार्क येथे विविध शासकीय इमारतींची उभारणी करण्यात येत आहे. याच ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी, तसेच भविष्यातील सर्किट बेंच आणि आयटी पार्क उभारण्यात येणार असल्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी हे ठिकाण अगदी योग्य म्हणावे लागेल. नव्या प्रशासकीय इमारतीत सर्व विभागांचे कामकाज एकाच छताखाली चालणार असल्यामुळे नागरिकांची सोय होणार आहे. - आमदार अमल महाडिक

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Corporation Headquarters to be in Shendapark; Five Acres Transferred

Web Summary : Kolhapur Municipal Corporation will build its headquarters in Shendapark after receiving five acres of land. The new building will consolidate services, benefiting citizens. Ajit Pawar had promised funds for the project before his death.